

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी
१ एप्रिलपासून या महिलांचा लाभ कायमचा बंद होणार
निकषात न बसणाऱ्या महिला ठरणार अपात्र
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आता अनेक महिलांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. लाडकी बहीण योजनेतून आणखी अनेक महिला अपात्र होऊ शकतात. या महिलांचा लाभ कायमचा बंद होण्याची शक्यता आहे. १ कोटी महिला अपात्र होऊ शकतात, असं सांगितलं जात आहे. दरम्यान, एप्रिलपासून या महिलांचा लाभ बंद होणार आहे.
एप्रिलपासून या महिलांचा लाभ बंद
लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये २१ ते ६५ वयोगटातील महिला लाभ घेऊ शकतात. त्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे. या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांचा लाभ बंद केला जाणार आहे. याचसोबत केवायसी न केलेल्या महिलांनाही लाभ मिळणार नाहीये.
लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना अनेक महिलांकडून चुका झाल्या आहेत. या चुका सुधारण्याची ही शेवटची संधी आहे. तुम्हाला ३१ मार्चपर्यंत पुन्हा केवायसी करायची आहे. केवायसी न केल्यास एप्रिलपासून लाभ बंद होणार आहे. केवायसी करुन पात्र ठरल्यास तुम्हाला रखडलेले सर्व हप्ते एकत्र मिळतील.
निकषांनुसार पात्र महिलांनाच हप्ते (Ladki Bahin Yojana Only These Women Get Benefit)
माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांची अंगणवाडी सेविकांद्वारे पडताळणी केली जाणार आहे. सर्व लाभार्थ्यांनी केवायसी करायची आहे. त्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत आहे. १ एप्रिलपासून फक्त पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनाच हप्ता मिळेल, असं प्रसाद मिरकले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर यांनी सांगितलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.