LPG Gas Cylinder: महत्वाची बातमी! केवायसी न केलेल्यांना गॅस सिलिंडर मिळणार नाही

LPG Shortage Fears: गॅस सिलिंडरच्या बाबतीत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. केवायसी न केलेल्यांना गॅस सिलिंडर मिळणार नाही. तसंच, सिलिंडर मिळण्यासाठीच्या दिवसांमध्ये ८ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

केवायसी न केलेल्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. केवायसी न केलेल्या ग्राहकांना घरगुती गॅस सिलिंडर आता मिळणार नाही. दोन सिलिंडरमधील अंतर २१ दिवसांवरून ३० दिवसांवर करण्यात आले आहे. सिलिंडर मिळण्यासाठीच्या दिवसांमध्ये ८ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. अनेक ग्राहकांचे केवायसी प्रलंबित असल्याने वितरकांकडे गॅसचा साठा कमी आहे. त्यामुळे घरगुती गॅसची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी गॅस काटकसरीने वापरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून जगावर युद्धाचे सावट आहे. इराण-इस्राइलमध्ये युद्धाचा भडका उडला आहे. त्याचा परिणाम आता सर्वच देशांना बसताना दिसत आहेत. इराणवर हल्ले होत असल्यामुळे इंधनाचा साठा भारतात येण्यामध्ये अडचणी होत आहेत. याचा परिणाम म्हणजे ग्राहकांच्या खिशावर बसत आहे. पेट्रोल-डिझेलच्या आणि गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. आता गॅस तुटवडा निर्माण झाल्यामुळे कंपन्यांनी गॅस सिलिंडर देण्याच्या नियमांमध्ये देखील बदल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com