Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता रखडला, मार्चचे ₹१५०० कधी येणार? वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana February-March Installment: लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता लांबणीवर गेला आहे. त्यानंतर आता मार्चचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

फेब्रुवारीचा हप्ता लांबणीवर

मार्चचे ₹१५०० कधी येणार

लाडकी बहीण योजनेच्या महिला फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आता मार्च महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. फेब्रुवारीचा हप्ता जमा झालेला नाही. त्यानंतर आता मार्चचा हप्ता कधी येणार असे प्रश्न विचारले जात आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

फेब्रुवारीचा हप्ता लांबणीवर (Ladki Bahin Yojana February Installment Delay)

लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता लांबणीवर गेला आहे. जानेवारीचे पैसे हे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात देण्यात आले आहेत. परंतु अजूनही फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.सुरुवातीला होळीआधी दोन्ही हप्ते एकत्र येतील , असं सांगितलं जात होते. मात्र, त्यातील एकच हप्ता जमा झाला आहे. त्यानंतर राज्याच्या अर्थसंकल्पापूर्वी पैसे दिले जातील, असं सांगितलं होतं. मात्र, अजूनही याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

मार्चचा हप्ता कधी? (Ladki Bahin Yojana March Installment Date)

लाडकी बहीण योजनेचा मार्चचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत महिलांना हप्ता देण्यात यावा, असं सांगितलं आहे. मात्र, काही कारणांमुळे हप्ता दर महिन्याला पुढे ढकलला जात आहे. त्यामुळेच हा हप्तादेखील पुढे जाण्याची शक्यता आहे. आता फेब्रुवारी मार्चचा हप्ता एकत्र येणार की दोन टप्प्यांमध्ये वेगवेगळा येणार याकडे सर्वांचेच लक्ष आहेत.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना रखडलेले हप्ते मिळणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

या महिलांना मिळणार नाही पैसे

लाडकी बहीण योजनेत काही महिलांना पैसे मिळणार नाहीयेत. ज्या महिलांनी केवायसी केली नाही त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. याचसोबत केवायसीमध्ये दुरुस्ती करत असलेल्या महिलांचेही हप्ते थांबवण्यात आले आहेत. केवायसी पूर्ण झाल्यानंतर त्यांना पैसे मिळणार आहेत.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com