Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

Ladki Bahin Yojana Big Announcement in Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची घोषणा अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षभरासाठी निधीची तरतूद केली जाऊ शकते.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा

निधीची तरतूद होणार

राज्याचा अर्थसंकल्प येत्या दोन दिवसात सादर केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात २०२६-२७ साठी अनेक आर्थिक तरतूदी केल्या जातील. अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची घोषणा केली जाऊ शकते. अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेत २१०० रुपयांची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

लाडकी बहीण योजनेसाठी निधीची तरतूद

लाडकी बहीण योजनेसाठी २०२६-२७ साठी आर्थिक तरतूद केली जाणार आहे. वर्षभरासाठी निधी किती लागणार, याबाबत घोषणा केली जाते. लाडकी बहीण योजनेत मागच्या वर्षी ३६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी हा निधी वापरण्यात येणार होता. त्यानंतर आता पुढच्या २०२६-२७ साठी निधीची घोषणा केली जाईल.

अर्थसंकल्पात महत्त्वाचे निर्णय

राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महत्त्वाची घोषणा केली जाऊ शकते. यामध्ये शेतकऱ्यांसाठी, कर्जमाफीसंदर्भात निर्णय घेतले जाऊ शकतात.याचसोबत लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय निर्णय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.लाडकी बहीण योजनेचा निधी २१०० रुपये करण्याची घोषणा केली होती. मात्र, आता दोन वर्ष उलटून गेले तरीही अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पात निर्णय होणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना ₹२१०० कधी मिळणार? २ दिवसात राज्य सरकार करणार मोठी घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com