Nashik Shocking : TCS धर्मांतर प्रकरणानंतर आणखी एक भयानक कांड; तरुणीच्या गळ्यातील तुळशीमाळ काढली अन् दारू पाजून केला बलात्कार

Nashik Assault Case After Tcs Incident Woman: नाशिकमध्ये TCS प्रकरणानंतर पुन्हा एक धक्कादायक लैंगिक अत्याचार उघडकीस आला आहे. पीडित तरुणीला जबरदस्तीने दारू पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची तक्रार असून पंचवटी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Police investigation underway in Nashik after a shocking assault case involving forced intoxication and abuse.
Police investigation underway in Nashik after a shocking assault case involving forced intoxication and abuse.saam tv
Published On

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिकमध्ये महिलांवरील अत्याचारच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र दिसत आहे. नामांकित TCS कंपनीतील महिला लैंगिक अत्याचार आणि बळजबरी धर्मांतरण प्रकरणानंतर आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तंजीर इनामदार असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार या नराधमाने तिला विविध ठिकाणी नेऊन बळजबरीने दारू आणि सिगरेट पाजली. त्यानंतर तिचे लैंगिक शोषण केले. तंजीर पीडितेच्या धार्मिक भावना दुखावत तिच्या गळ्यातील तुळशीमाळ आणि हातावरील पवित्र धागे काढून टाकले. इतकेच नाही तर एका मुस्लिम धर्माच्या रिवाजाप्रमाणे गजवा ए हिंद करण्याच्या सूचनाही तिला दिल्याच्या तक्रारीत म्हटले आहे.

Police investigation underway in Nashik after a shocking assault case involving forced intoxication and abuse.
करमाळ्यात मेंढपाळसहीत महिलेला मारहाण, व्हिडिओ व्हायरल

जानेवारी २०२६ मध्ये संशयिताने पीडितेच्या गळ्याजवळ चावा घेऊन ते 'लव्ह बाईट' असल्याचे सांगत तिचे आक्षेपार्ह फोटो मोबाईलमध्ये काढले होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तरुणीला वारंवार लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेत आपबिती सांगितली.

Police investigation underway in Nashik after a shocking assault case involving forced intoxication and abuse.
Nashik TCS Case: नाशिक धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गर्भवती होती की नव्हती? डॉक्टरांनी सांगितलं सत्य

तंजीर इनामदार याने अशाच पद्धतीने आणखी काही मुलींसोबत गैरकृत्य केल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, सध्या या प्रकरणात एकच तक्रार समोर आली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पंचवटी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.नाशिकमध्ये एकापाठोपाठ एक अशा घटना समोर येत असल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com