Baseer Ali Controversy: 'बिग बॉस' फेम अभिनेत्याचे सोशल मीडिया अकांऊट हॅक; अभिनेत्याने 'त्या' पोस्टबाबत केला खुलासा

Baseer Ali Controversy: रिअ‍ॅलिटी शो स्टार बसीर अली नव्या अडचणीत सापडला आहे. एका पोस्टवर 'लाईक' केल्यामुळे त्याला ट्रॉलिंगचा सामना करावा लागत आहे. या अभिनेत्याने सांगितले की, त्याचे अकांऊट हॅक करण्यात आले होते.
Baseer Ali Controversy
Baseer Ali ControversySaam Tv
Published On

Baseer Ali Controversy: रिअॅलिटी शोमधून लोकप्रिय झालेला 'बिग बॉस' फेम बासीर अली सध्या एका नव्या वादामुळे चर्चेत आला आहे. बासीर अली यावेळी कोणत्याही नवीन शोमुळे नव्हे, तर सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे आणि त्यावरुन झालेल्या आरोपांमुळे चर्चेचा विषय ठरला आहे.

Bigg Boss 19 मधून आपल्या स्पष्टवक्ते स्वभावामुळे प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या बासीर अलीवर सोशल मीडियावर “द्वेष पसरवल्याचा” गंभीर आरोप करण्यात आला. काही व्हायरल स्क्रीनशॉट्समध्ये असा दावा करण्यात आला की, त्याच्या X (पूर्वीचे Twitter) आणि Instagram अकांऊटवरून अशा पोस्ट्सना 'लाईक' करण्यात आले आहे. ज्यामुळे समाजात वाद निर्माण होऊ शकतो.

Baseer Ali Controversy
Bigg Boss Marathi 6 Winner: बिग बॉस मराठी 6 च्या विजेत्याचं नाव फिनालेपूर्वीच लीक; 'हा' स्पर्धक जिंकणार ट्रॉफी!

हे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर वेगाने पसरताच चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. प्रकरण गंभीर होत असल्याचे लक्षात येताच, बासीर अलीने तात्काळ स्पष्टीकरण देत या सर्व आरोपांना फेटाळून लावले. आपल्या पहिल्या पोस्टमध्ये त्याने स्पष्ट केले की, व्हायरल होत असलेले सर्व स्क्रीनशॉट्स बनावट असून त्याचा त्यांच्याशी कोणताही संबंध नाही.

Baseer Ali Controversy
Asha Bhosle: 'मला गाताना मृत्यू यावा एवढंच देवाकडे मागणं...'; सुरसम्राज्ञी आशा भोसलेंचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

“मी कोणत्याही प्रकारच्या द्वेषाचे समर्थन करत नाही,” असे ठामपणे सांगत त्याने चाहत्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले. मात्र, यानंतर या सर्व गोंधळाच्या परिस्थितीला नवे वळण मिळाले.

दुसऱ्याच दिवशी बासीरने आणखी एक पोस्ट करत धक्कादायक खुलासा केला. त्यानुसार, त्याचे सोशल मीडिया अकांऊट हॅक झाले असल्याचे त्याने त्याने सांगितले. बसीर म्हणाला, त्याच्या टीमच्या माहितीनुसार काही अनोळखी व्यक्तींनी कदाचित VPN च्या माध्यमातून ऑस्ट्रियातून लॉग-इन करून त्याच्या अकांऊट ओपन केलं आहे. या व्यक्तीने त्याच्या परवानगीशिवाय काही आक्षेपार्ह पोस्ट्स केल्याचा दावा बासीरने केला. सध्या तो आपले अकांऊट सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत असून, अलीकडील सर्व संशयास्पद पोस्ट्स दुर्लक्षित करण्याची विनंती त्याने चाहत्यांना केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com