योगेश काशीद, साम टीव्ही
मुस्लिम समाजाचे एसीबीसीचे पाच टक्के आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ बीडमध्ये 17 एप्रिल रोजी मोर्चा निघणार आहे. या संदर्भात आज बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन मुस्लिम आरक्षण कृती समितीने माहिती दिली. मोर्चाचे नियोजन पूर्ण झाले असून हा मोर्चा ऐतिहासिक होणार आहे. सरकारने या संदर्भात तात्काळ उपाययोजना कराव्यात आणि मुस्लिम आरक्षणा संदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी ही यावेळी समन्वयकांनी केली.
17 एप्रिल रोजी बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. सर्वसामान्य मुस्लिम समाजाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये सर्व राजकीय नेत्यांनी देखील सहभाग घेऊन पाठिंबा द्यावा असे आवाहन समन्वयकांनी केले आहे.
सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मुस्लिमांना दिलेले पाच टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय कशाच्या आधारे घेतला? अशी विचारणा उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला केली. तसेच तीन आठवड्यात त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
न्यायमूर्ती रियाज छागला आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठापुढे याचिकाकर्ते आणि वकील एजाझ नक्वी यांनी या प्रकरणी केलेल्या याचिकेवर सूनवाई झाली. त्यावेळी थोडक्यात युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.