बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून हालचालींना वेग आला आहे. या दोन्ही ठिकाणच्या पोटनिवडणुका बिनविरोध होणार असल्याचे म्हटले जात होते. पण आता इतर राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यास सुरूवात केली आहे. राहुरी आणि बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याची चिन्ह दिसत आहेत. बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार असल्याची माहिती काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. दुसरीकडे दोन्ही जागा राष्ट्रवादीच्या आहेत. त्यामुळे काँग्रेसशी चर्चा करू असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी म्हटलं आहे. संजय राऊतांनी मात्र चर्चा करुन निर्णय घेऊ अशी सावध भूमिका घेतली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.