Sambhajinagar News: मुलाच्या हट्टापायी क्षणात संपूर्ण कुटुंब संपलं, संभाजीनगरच्या कुणालच्या आत्महत्येमागचं हादरवणारं कारण समोर

Sambhajinagar Family Death Case: संभाजीनगरमध्ये मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या घटनेमागचं हादरवणारं कारण समोर आले आहे.
Sambhajinagar News: मुलाच्या हट्टापायी क्षणात संपूर्ण कुटुंब संपलं, संभाजीनगरच्या कुणालच्या आत्महत्येमागचं हादरवणारं कारण समोर
Sambhajinagar Family Death CaseSaam Tv
Published On
  • खवडा डोंगरावर मुलाला वाचवताना आई वडिलांचा मृत्यू

  • एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूमुळे संभाजीनगर हादरले

  • कुणाल चांदगुडे आत्महत्येच्या प्रयत्नामागचे धक्कादायक कारण समोर

  • आयफोन घेण्यावरून वाद झाल्यानंतर कुणालने उचलले टोकाचे पाऊल

छत्रपती संभाजीनगर शहरातील घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. १८ वर्षीय तरुणाच्या हट्टापायी संपूर्ण कुटुंब क्षणात संपलं. या मन सुन्न करणाऱ्या घटनेची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. डोंगराच्या टोकावर उभं राहून आत्महत्या करणाऱ्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडील आणि त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर धक्का बसलेल्या आईने देखील डोंगरावरून उडी मारून आयुष्य संपवलं. या घटनेचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगावजवळच्या खवडा डोंगराजवळ घडली.

दुपारच्या सुमारास ३ तास ही संपूर्ण थरारक घटना सुरू होती. मुलाला समजवण्याच्या प्रयत्नात आई-वडिलांसह तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी हात टेकले. शेवटी सर्वांच्या डोळ्यासमोर मुलगा आणि आई-वडिलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. मुलाने हे कृत्य का केले? असा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर या घटनेमागचे हादरवून टाकणारे कारण समोर आले आहे.

Sambhajinagar News: मुलाच्या हट्टापायी क्षणात संपूर्ण कुटुंब संपलं, संभाजीनगरच्या कुणालच्या आत्महत्येमागचं हादरवणारं कारण समोर
Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

कुणाल चांदगुडे असं १९ वर्षीय मुलाचं नाव होते. कुणालच्या हट्टापायी तो आणि त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे (४८ वर्षे) आणि आई संगीता चांदगुडे या तिघांचा मृत्यू झाला. कुणालने टोकाचे पाऊल उचलण्यामागचे जे कारण समोर आलं ते ऐकून सर्वांना धक्का बसला. केवळ एका मोबाईल फोन घेण्यावरून कुणालने हे भयंकर कृत्य केले. अपडेटेड आयफोन घेण्यावरून कुणालचा आई-वडिलांसोबत वाद झाला होता. त्यानंतर सकाळी १० वाजता तो थेट खवड्या डोंगरावर गेला.

Sambhajinagar News: मुलाच्या हट्टापायी क्षणात संपूर्ण कुटुंब संपलं, संभाजीनगरच्या कुणालच्या आत्महत्येमागचं हादरवणारं कारण समोर
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई! मृत व्यक्तीच्या घराची झाडाझडती घेतली, पोलिसांनी दार उघडला, आतील दृश्य बघून हादरले

मुलगा रागाच्या भरात काही तरी टोकाचे पाऊल उचलेल असं आई-वडिलांना वाटले त्यामुळे ते देखील त्याचा पाठलाग करत तिथपर्यंत पोहचले. कुणाल थेट डोंगराच्या टोकावर उभा राहिला. आई-वडिलांच्या काळजाचा ठोका चुकला. आपला मुलगा खाली पडेल त्याचं काही बरं वाईट झालं तर आपलं कसं होणार असा प्रश्न त्यांना पडला होता. त्याच्या आई-वडिलांनी हात जोडून त्याच्याकडे वारंवार विनंती केली. आई-वडिलांसोबत गावचे सरपंच आणि गावकरी देखील डोंगरावर पोहचले. त्यांनी देखील त्याला समजवण्याचा प्रयत्न केला.

Sambhajinagar News: मुलाच्या हट्टापायी क्षणात संपूर्ण कुटुंब संपलं, संभाजीनगरच्या कुणालच्या आत्महत्येमागचं हादरवणारं कारण समोर
Chatrapati Sambhajinagar: ७ महिन्यांच्या चिमुकल्याने गिळले काचेचे तुकडे; संभाजीनगरमधील धक्कादायक घटना, डॉक्टरांनी असा वाचवला जीव

तीन तास सर्वजण कुणालला समजवण्याचा प्रयत्न करत होते. पण कुणाल काही ऐकायला तयार नव्हता. पोलिस, अग्निशमन दलाचे कर्मचारी देखील त्याला वाचवण्यासाठी घटनास्थळी पोहचले. त्यावेळी शेवटी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी कुणालच्या वडिलांनी त्याच्या दिशेने धाव घेत हात पकडून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण कुणाल खाली पडला पण त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याच्या वडिलांचाही पाय घसरला आणि ते कुणालसोबत डोंगरावरून खाली पडले.

Sambhajinagar News: मुलाच्या हट्टापायी क्षणात संपूर्ण कुटुंब संपलं, संभाजीनगरच्या कुणालच्या आत्महत्येमागचं हादरवणारं कारण समोर
Sambhajinagar Crime: संभाजीनगर हादरले! दोन गटात तुफान हाणामारी, लाथाबुक्क्या अन् दांडक्याने मारहाण; महिलांनाही सोडले नाही

मुलगा आणि नवरा खाली पडल्याचे पाहून आता सर्वकाही संपवलं असं वाटत कुणालच्या आईला मोठा धक्का बसला. त्यांनी देखील काही सेकंदात डोंगरावरून खाली उडी मारली. तिघंही गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी ही संपूर्ण घटना मोबाईलमध्ये कैद केली. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Sambhajinagar News: मुलाच्या हट्टापायी क्षणात संपूर्ण कुटुंब संपलं, संभाजीनगरच्या कुणालच्या आत्महत्येमागचं हादरवणारं कारण समोर
Badlapur: बदलापूर हादरले! उल्हास नदीत उडी मारून महिलेची आत्महत्या, थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com