Sambhajinagar Crime: संभाजीनगर हादरले! दोन गटात तुफान हाणामारी, लाथाबुक्क्या अन् दांडक्याने मारहाण; महिलांनाही सोडले नाही

Two Groups Engage in Brutal Street Fight In Sambhajinagar: संभाजीनगरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी झाली. दोन्ही गटांनी एकमेकांना लाथाबुक्क्या आणि दांडक्याने मारहाण केली. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Sambhajinagar Crime: संभाजीनगर हादरले! दोन गटात तुफान हाणामारी, लाथाबुक्क्या अन् दांडक्याने मारहाण; महिलांनाही सोडले नाही
Sambhajinagar CrimeSaam Tv
Published On
  • संभाजीनगरच्या वाळूजमध्ये दोन गटात तुफान हाणामारी

  • जुन्या वादातून लाथाबुक्क्या आणि दांडक्याने मारहाण

  • महिलांनाही मारहाण केल्याचा आरोप

  • ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली

माधव सावरगावे, संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. जुन्या वादातून दोन गट आमनेसामने आले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरात ही घटना घडली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सायंकाळी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.

याप्रकरणी दुर्गा संजय पांढरे (वय ५०, रा. बकवालनगर, दत्तमंदिराजवळ, वाळूज) यांनी वाळूज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांच्या जनरल स्टोअर्स दुकानासमोर त्यांचा पुतण्या महेश अनिल पांढरे उभा असताना ज्ञानेश्वर वनारसे, सपना वनारसे, गौरी वनारसे आणि कार्तिक वनारसे यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

Sambhajinagar Crime: संभाजीनगर हादरले! दोन गटात तुफान हाणामारी, लाथाबुक्क्या अन् दांडक्याने मारहाण; महिलांनाही सोडले नाही
Crime: लग्नात रक्तरंजित थरार! आवडतं गाणं न वाजवल्यानं वऱ्हाडी संतापले, नवरदेवाच्या काकाची चाकूने वार करत हत्या

वाद वाढल्यानंतर आरोपींनी महेश पांढरेला हाताने मारहाण केली. त्यावेळी भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या संजय पांढरे यांच्यावर कार्तिक वनारसेने लाकडी दांड्याने पोटावर आणि पाठीवर वार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दुर्गा पांढरे यांनाही दांड्याने मारहाण करण्यात आली. तसेच महेश पांढरे यालाही लाकडी दांड्याने मारून जखमी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.वाळूजमध्ये दोन गटात तुफान हाणामारी

  1. संभाजीनगर व्हायरल मारहाणीचा व्हिडिओ

  2. जुन्या वादातून दांडक्याने मारहाण

  3. महिलांनाही मारहाण केल्याचा आरोप

Sambhajinagar Crime: संभाजीनगर हादरले! दोन गटात तुफान हाणामारी, लाथाबुक्क्या अन् दांडक्याने मारहाण; महिलांनाही सोडले नाही
Crime: दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले, घरात घुसून मायलेकीची हत्या; नंतर आरोपीने उचललं टोकाचं पाऊल

मारहाणीनंतर संबंधितांनी वाळूज पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठविल्यानंतर उपचार घेऊन त्यांनी पुन्हा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, दोन गटांत झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत वाळूज पोलिसांनी सायंकाळी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Sambhajinagar Crime: संभाजीनगर हादरले! दोन गटात तुफान हाणामारी, लाथाबुक्क्या अन् दांडक्याने मारहाण; महिलांनाही सोडले नाही
Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com