Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

Mumbai Police: मुंबईतल्या पवईमध्ये एका तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. रिक्षाचालकासोबत वाद झाला होता. या रागातून तरुणाने रिक्षाचालक समजून दुसऱ्याचीच हत्या केली.
Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या
Mumbai CrimeSaam TV
Published On
  • पवईमध्ये भयंकर हत्याकांड

  • रिक्षाचालक समजून दुसऱ्याची हत्या

  • सीसीटीव्ही फुटेजमुळे पवई हत्येचा उलगडा

  • रिक्षाचालकाशी वादातून निरपराध व्यक्तीची हत्या

संजय गडदे, मुंबई

पवई परिसरात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या अंध हत्येचा उलगडा करण्यात पवई पोलिसांना यश आले असून मुख्य आरोपी दीपक उर्फ दिपू नथुप्रसाद वर्मा याला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. रिक्षाचालकाशी झालेल्या जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपीने चुकीच्या व्यक्तीची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे.

२५ मे रोजी रात्री उशिरा पवईतील साकीविहार रोड, टुंगा गाव परिसरातील लोढा सुप्रिमस आउट गेटजवळ एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पवई पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी व्यक्तीला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृताच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केल्याचे स्पष्ट झाले होते.

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या
Crime: लग्नात रक्तरंजित थरार! आवडतं गाणं न वाजवल्यानं वऱ्हाडी संतापले, नवरदेवाच्या काकाची चाकूने वार करत हत्या

या प्रकरणी पोलिस शिपाई विजय अरुण घाडगे यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी परिसरातील शंभरहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान संशयित आरोपी गुजरातला पळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या
Dombivli Crime: डोंबिवली हादरली! तरुणाकडून शेजारच्याची हत्या, घरात घुसून चाकूने सपासप वार करत संपवलं

पोलिस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभार, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त नवनीथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक गुजरातला रवाना करण्यात आले. या पथकाने सुरत येथील पुष्पकनगर, राजस्थान स्कूलजवळ दीपक वर्मा याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दीपक हा मूळ बिहारचा रहिवासी असून सध्या पवईतील टुंगा गाव परिसरात राहत होता.

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या
Crime: दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले, घरात घुसून मायलेकीची हत्या; नंतर आरोपीने उचललं टोकाचं पाऊल

काही दिवसांपूर्वी मित्रांसोबत मद्यपान करत असताना परिसरात रिक्षा पार्क करणाऱ्या रिक्षाचालकाशी त्याचा वाद झाला होता. त्या वादातून त्याने संबंधित रिक्षाचालकावर हल्ला करण्याचा कट रचला होता. मात्र घटनेच्या रात्री मोहम्मद युसुफ हा त्याच ठिकाणी झोपलेला असल्याने आरोपीने त्यालाच रिक्षाचालक समजून धारदार शस्त्राने वार केले.

गंभीर जखमी झालेल्या युसुफचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपी मुंबईतून गुजरातला फरार झाला होता. मात्र सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिसांनी त्याचा माग काढत अवघ्या काही तासांत त्याला अटक केली. पुढील तपास पवई पोलीस करत आहेत.

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या
Pune Crime: पुण्यात उच्चभ्रू सोसायटीत वेश्या व्यवसाय, पोलिसांनी धाड टाकली; ४ परदेशी तरुणींनी नको त्या अवस्थेत पकडलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com