Dombivli Crime: डोंबिवली हादरली! तरुणाकडून शेजारच्याची हत्या, घरात घुसून चाकूने सपासप वार करत संपवलं

Dombivli Youth Killed Neighbour: डोंबिवलीमध्ये एका तरुणाने शेजारच्याची घरामध्ये घुसून हत्या केली. चाकूने सपासप वार करत आरोपीने तरुणाचा जीव घेतला. या घनटेमुळे डोंबिवली हादरली.
Dombivli Crime: डोंबिवली हादरली! तरुणाकडून शेजारच्याची हत्या, घरात घुसून चाकूने सपासप वार करत संपवलं
Dombivli CrimeSaam Tv
Published On
  • डोंबिवलीत घर बांधण्याच्या वादातून तरुणाची हत्या

  • शेजाऱ्याने घरात घुसून चाकू हल्ला करत संपवलं

  • डोंबिवली बाळपाडा परिसरात घडली घटना

  • टिळकनगर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली

डोंबिवलीमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. एका तरुणाने शेजारी राहणाऱ्या तरुणाची घरात घुसून निर्घृण हत्या केली. ही घटना डोंबिवलीच्या बाळपाडा परिसरात परिसरात घडली. घर बांधण्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. याच रागातून तरुणाने शेजारच्याची हत्या केली. हत्येनंतर आरोपी फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच टिळकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे डोंबिवलीत खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरात आज ही घटना घडली. घर बांधण्याच्या वादातून शेजाऱ्याने शेजाऱ्याची हत्या केली. आज दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे नाव प्रताप चौधरी असे होते. घर बांधण्याच्या कारणावरून सुरू असलेल्या वादातून आरोपी रोहित शेलारने प्रताप चौधरी यांच्यावर घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला केला.

Dombivli Crime: डोंबिवली हादरली! तरुणाकडून शेजारच्याची हत्या, घरात घुसून चाकूने सपासप वार करत संपवलं
Mumbai Crime: मुंबईत ड्रग्ज फॅक्ट्री उद्ध्वस्त, ५०.७४ कोटींचा मेफेड्रॉनचा साठा जप्त; कोण आहे मालक?

या हल्ल्यात प्रताप चौधरी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर आरोपी रोहित शेलार हा फरार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती डोंबिवलीचे एसीपी सुहास हेमाडे यांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच टिळक नगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून परिसराची पाहणी करत तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे खंबाळपाडा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Dombivli Crime: डोंबिवली हादरली! तरुणाकडून शेजारच्याची हत्या, घरात घुसून चाकूने सपासप वार करत संपवलं
Crime: दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले, घरात घुसून मायलेकीची हत्या; नंतर आरोपीने उचललं टोकाचं पाऊल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com