सत्ताधारी महिला आमदाराच्या ताफ्यावर हल्ला; भररस्त्यात गाडी अडवत केली जातीवाचक शिवीगाळ, सुरक्षा रक्षकांना मारलं

Attack on MLA Jyoti Manjhi Convoy : बिहारमध्ये महिला आमदार ज्योती मांझी यांच्या ताफ्यावर भररस्त्यात हल्ला करण्यात आला. सुरक्षा रक्षकांना मारहाण झाल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. गया जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
Attack on  MLA Jyoti Manjhi Convoy
Jyoti Manjhi convoy assault full incident details
Published On
Summary
  • बिहारमध्ये महिला आमदार ज्योती मांझी यांच्या ताफ्यावर हल्ला.

  • सुरक्षा रक्षकांना भररस्त्यात मारहाण झाली.

  • सामाजिक कार्यक्रमाला जात असताना ताफा अडवण्यात आला त्यानंतर हल्ला झाला.

बिहारमधील गया जिल्ह्यातील बाराचट्टी येथील विधानसभा मतदारसंघाच्या आमदार ज्योति मांझी यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे. ज्योति मांझी या हिंदुस्तान आवाम मोर्चा पार्टीच्या आमदार आहेत. ही घटना मोहनपूर प्रखंडच्या बमुआर पंचायतीच्या गंभीरा गावात झाली. हाती आलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी आमदाराचा ताफा अडवण्यात आला, त्यानंतर त्यांच्याशी गैरवर्तन करण्यात आलं. इतकेच नाही तर आमदाराच्या सुरक्षा रक्षकांना मारहाणदेखील केली.

Attack on  MLA Jyoti Manjhi Convoy
भाजप नगरसेवकांच्या घरावर बुलडोझर फिरणार? मनपाच्या नोटीसनंतर नेत्यांची धडधड वाढली

रस्ता अडवून आमदाराच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला

आमदार ज्योती मांझी रविवारी मोहनपूर तालुक्यातीलगंभीरा गावात एका सामाजिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी जात होत्या. एका प्रवासी वाहनाने त्यांच्या ताफ्याचा मार्ग अडवला. चालकाने जाणीवपूर्वक वाहन रस्त्याच्या मधोमध उभे करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला असा आरोप करण्यात येत आहे. ज्यावेळी आमदाराच्या सुरक्षा रक्षकांनी रस्त्यात उभे केलेले वाहन बाजुला करण्यास सांगितलं तेव्हा गाडीमध्ये बसलेले १५ ते २० जण खाली उतरले आणि त्यांनी सुरक्षा रक्षकांसह वाद घालण्यास सुरुवात केली.

Attack on  MLA Jyoti Manjhi Convoy
मुख्यमंत्र्यांसोबत राष्ट्रवादीमधील अंतर्गत वादाची चर्चा? फडणवीसांनी सांगितली पार्थ पवारांच्या भेटीची आतली गोष्ट

हल्ला झाला त्यावेळी आमदार ज्योति मांझी या आपल्या स्कॉर्पियो कारमध्ये बसून राहिल्या. हल्लेखोरांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. कारच्या काचा तोडल्या. परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण होती आणि त्यांना स्वतःच्या सुरक्षेची भीती वाटत होती, असं आमदार ज्योति मांझी यांनी सांगितले. गावकऱ्यांच्या मदतीने ज्योति मांझी यांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले. या घटनेनंतर आमदारांनी जवळच्या गावकऱ्यांना माहिती दिली.

स्थानिक रहिवासी घटनास्थळी पोहोचल्यानंतर आमदार, त्यांचे अंगरक्षक आणि समर्थकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. याप्रकरणी आमदारने मोहनपूर येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. एफआयआरमध्ये अनेक लोकांची नावे दाखल करण्यात आली आहेत. तर अनेक अज्ञातांना आरोपी बनवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com