

संभाजीनगरमध्ये भाजप नगरसेवकांना अतिक्रमणाबाबत मनपाच्या नोटिसा.
इम्तियाज जलील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला वेग.
काही नगरसेवकांनी स्वतःहून अतिक्रमण हटवले.
छत्रपती संभाजीनगरमधील भाजप नगरसेवकांना मनपाच्या कारवाईची भीती वाटू लागली आहे. भाजच्या नगरसेवकांच्या घरावर थेट बुलडोझर फिरणार असल्याची शक्यता आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिकेत अतिक्रमणाविषयी तक्रार देण्यात आली आहे. माजी खासदार यांच्या तक्रारीनंतर मनपाकडून नगरसेवकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
दरम्यान महानगरपालिकेच्या तक्रारीनंतर भाजप नगरसेवक गणेश नावंदर आणि विश्वनाथ स्वामी यांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले आहे. दुसरीकडे महानगरपालिकेने आजपर्यंत स्वतःहून अतिक्रमण काढण्याचा वेळ दिला होता. आता उर्वरित नगरसेवकांच्या घरावर कारवाई कधी होणार हे पाहावं लागेल.
माजी खासदार इम्तियाज जलील यांना आत्ताच तक्रार का दिली असा प्रश्न अनेकांना पडला असेल. परंतु या तक्रारीला पार्श्वभूमी आहे नाशिकमधील टीसीएस धर्मांतर प्रकरणाची. हो, या धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेली निदा खानला एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी आश्रय दिला होता. त्यानंतर महानगरपालिकेने मतीन पटेल यांच्या घरावर बुलडोझर चालवत अतिक्रमणात असलेला घराचा भाग जमीनदोस्त केला होता. त्यानंतर संतप्त झालेले एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी महापालिकेत भाजप नगरसेवकांच्या विरोधात तक्रार दिली.
भाजप नगरसेवकांच्या घराचे अतिक्रमण असल्याची तक्रार मनपाला मिळाल्यानंतर त्यांना नोटीस बजावण्यात आली. जलील यांनी भाजप नगरसेवकांचे कागदपत्रे देऊन नगरसेवकांचे अतिक्रमण काढण्याची तक्रार दिली. या तक्रारीनंतर महानगरपालिकेने नगरसेवकांना स्वतःहून अतिक्रमण काढण्याचा वेळ दिला होता. त्यानंतर भाजप नगरसेवक नावंदर आणि स्वामी यांनी स्वतःहून आपल्या अतिक्रमण काढली आहेत.
एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या कौसर पार्क येथील घरावर आणि नारेगाव येथील कार्यालयावर महापालिकेने मुदतीची नोटीस चिटकवली होती. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने कारवाई करत हे कौसर पार्क येथील घर जमीनदोस्त केलंय. ‘एमआयएम’चे नगरसेवक मतीन मजीद शेख यांचे घर आणि दुकाने बेकायदा असल्याचा दावा करून, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने त्यांच्या घरावर नोटीस चिकटवली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.