Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; थेट तारीखच सांगितली...

CM Devendra Fadnavis On Farmer Loan Waiver: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबाबत आज मोठी घोषणा केली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांनी कधीपर्यंत कर्जमाफी होणार याची तारीख सांगितली.
Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; थेट तारीखच सांगितली...
CM Devendra Fadnavis Saam Tv
Published On
  • महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीसंदर्भात दिली मोठी अपडेट

  • शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मोठी घोषणा

  • ३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर होणार

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. लवकरच सरकारकडून कर्जमाफीची घोषणा केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट दिली. पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी थेट कर्जमाफीची तारीख सांगितली. ३० जूनपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करू असे त्यांनी सांगितले. यावेळी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील कर्जमाफीबाबत महत्वाची अपडेट दिली.

मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितले की, 'राज्य सरकारची कर्जमाफीच्या संदर्भात तयारी अंतिम टप्प्यात आहे. या संदर्भात कॅबिनेट मंत्रिमंडळात चर्चा पार पडली आहे. काही जिल्ह्यांची अतिरिक्त माहिती मागवण्यात आली असून ती आल्यानंतर प्रक्रिया सुरू केली जाईल. ३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करण्यात येईल.' दरम्यान, बच्चू कडू आणि शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी सरकारने जून महिन्यात कर्जमाफी केली जाईल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी थेट कर्जमाफीसंदर्भात तारीख सांगून टाकली.

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; थेट तारीखच सांगितली...
Maharashtra Government : पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारनं घेतले ३ मोठे निर्णय, अधिकार्‍यांच्या दौऱ्यावर बंदी अन्...

पुणे ॲग्री हॅकेथॉन पारितोषिक वितरण आणि समारोप समारंभ कार्यक्रमात बोलताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, 'ही संकल्पना योजना राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली. आज सर्वांना माहिती आहे पारंपारिक शेती न करता एआय मार्फ अधिक आणि चांगलं उत्पन्न देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. शेतकरी राजा सुखी झाला पाहिजे अशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि एकूण मंडळांची इच्छा आहे. कृषी विभागातील एआय धोरण वापरणारे देशातील पहिले आपल्या राज्य ठरलं आहे. शेतीमध्ये नवीन गोष्टी आत्मसात केल्या तर यश मिळाले. कृषीचा कार्यक्रम म्हटले की निश्चित अजितदादांची आठवण येते.'

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; थेट तारीखच सांगितली...
Maharashtra Heatwave : धक्कादायक! फुले तोडण्यासाठी शेतात गेल्या, उष्माघाताने ३५ वर्षाच्या महिलेचा मृत्यू; सोलापूरधील दुर्दैवी घटना

'अजितदादा पवार आपल्यामध्ये नाहीत. शेतीत बांधावर जाणार नेता, धारा काढणारा नेता आपल्यात राहिला नाही. पण त्यांच्या प्रेरणेने आम्ही काम करत आहोत. शेतमालासा चांगला बाजारभाव कसा मिळेल हे आम्ही पाहत आहोत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना कायमच मदत केली आहे. शेतकरी सुखी समाधानी राहिला पाहिजे ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. लवकर कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री घेतील.'

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; थेट तारीखच सांगितली...
Maharashtra Government: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, इंधन बचतीबाबत सरकारी अधिकाऱ्यांना महत्वाचे निर्देश; १९ उपाययोजना जाहीर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com