मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या बोगद्यामध्ये जाताच नेटवर्क गायब; प्रवाशांनी व्यक्त केली मोठी भीती

mumbai-pune missing link : मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या बोगद्यामध्ये जाताच नेटवर्क गायब होत असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे प्रवाशांनी चिंता व्यक्त केली आहे.
mumbai-pune
mumbai-pune Saam Tv
Published On
Summary

मिसिंग लिंकच्या बोगद्यात नेटवर्क होतंय गायब

नेटवर्क गायब होऊ लागल्याने प्रवाशांची चिंता वाढली

नेटवर्क मिळत नसल्याने मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता

मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रवासासाठी खुला झालाय. या लिंकमुळे मुंबई-पुणे प्रवासाचं अंतर देखील कमी झालंय. या मार्गावरील वाहतूक कोंडी देखील फुटली आहे. परंतु आता या लिंकमधील बोगद्यात गेल्यावर मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे प्रवाशांना थोडा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे अपघाताची परिस्थिती उद्भवल्यास धोका निर्माण होऊ शकतो.

मीडिया रिपोर्टनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकचं लोकार्पण झालं. महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाकडून या मार्गाचं बांधकाम करण्यात आलंय. या मार्गावर २ बोगदे आहेत. दोन बोगद्यांमध्ये दोन केबल-स्टेड पूल आहेत. मुंबई-पुणे महामार्गावर घाटातून प्रवासासाठी १९ किलोमीटर अंतर पार करावं लागतं. आता मिसिंग लिंकमुळे अंतर १३ किमीवर आलं आहे. तसेच वेळेची देखील बचत होते.

mumbai-pune
पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आणखी एक धक्का बसणार; आता मोबाईल रिचार्ज महागण्याची शक्यता

मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरील बोगद्यामध्ये गेल्यावर नेटवर्क नसल्याची तक्रार अनेक वाहनचालकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर बोगद्यात अचानक एखादा वाहन बंद पडल्यास किंवा अपघात झाल्यास मदत मागवणे कठीण होणार आहे. बोगद्यात गेल्यानंतर नेटवर्क गायब होत असल्याने प्रवाशांची चिंता वाढली आहे.

mumbai-pune
Mumbai-Pune Expressway Missing Link: मुंबई- पुणे कनेक्टिव्हिटी बिघडली; एक्सप्रेसवेवर कोंडी नियोजनचं 'मिसिंग'

या लिंकवर डोंगरावरील कठीण खडकांमधून बोगदे तयार करण्यात आलेत. डोंगरात टायगर व्हॅलीमध्ये पुलांना हे बोगदे जोडण्यात आले आहेत. डोंगरावरील नेटवर्क कठीण खडक किंवा दगडातून आतमध्ये पोहोचणे शक्य नसते. त्यामुळे बोगद्याच्या आत नेटवर्कच्या समस्या आहेत. नेटवर्कसाठी आता बोगद्याच्या भीतींवर लिकी फिडर केबल्स टाकून नेटवर्क मिळण्याची शक्यता आहे. केबल अँटेनासारखे कार्य करते. यामळे संपूर्ण बोगद्यात नेटवर्क पोहोचण्यास मदत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com