मुख्यमंत्र्यांसोबत राष्ट्रवादीमधील अंतर्गत वादाची चर्चा? फडणवीसांनी सांगितली पार्थ पवारांच्या भेटीची आतली गोष्ट

CM Fadnavis Comment On Parth Pawar Meeting : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पार्थ पवार यांच्या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले होते. आता मुख्यमंत्र्यांनी भेटीमागील कारण सांगितले आहे.
CM Fadnavis Comment On  Parth Pawar Meeting :
nternal disputes within the party, Parth Pawar's meeting with Chief Minister Devendra Fadnavis has become a topic of discussion.saam tv
Published On
Summary
  • पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानक भेट घेतली.

  • राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वादाच्या चर्चांदरम्यान ही भेट झाली.

  • उशिरा रात्री झालेल्या बैठकीमुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले.

काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. या नाराजीनाट्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री एक नवीन घडामोड घडली. ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी शनिवारी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

पार्थ पवार भेटीची कोणालाच माहिती नव्हती. हे शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास दोन्ही नेत्यांची भेट झाली. या भेटीत त्यांच्यात कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत तर्क-वितर्कांचे पेव फुटले. आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवार भेटीची आतली गोष्ट सांगितली आहे. पुण्यातील कृषी महाविद्यालयात सिंचन नगर मैदानात पुणे ॲग्री हॅकॅथॉन 2026 पारितोषिक वितरण व समारोप समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीची माहिती दिली. यासह त्यांनी पार्थ पवार भेटीवर भाष्य केलं.

CM Fadnavis Comment On  Parth Pawar Meeting :
Maharashtra Government: मोठी बातमी! शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं?

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळल्याची बाब समोर आल्यानंतर नाराजीनाट्याला सुरुवात झाली होती. एकीकडे प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षात साईडलाईन केल्याची चर्चा सुरू आहे. पण सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी या सगळ्याबाबत काही प्रतिक्रिया दिली नाही.

CM Fadnavis Comment On  Parth Pawar Meeting :
राज्यातील पोलीस प्रशासनात मोठा फेरबदल; IPS सह ९६ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या; यादी आली समोर

तर दुसरीकडे आमदार रोहित पवार हे जवळपास दररोज प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर शा‍ब्दिक हल्ले चढवत आहेत. त्याच दमरम्यान पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत पार्थ पवार यांनी राष्ट्रवादीतील वादाची चर्चा मुख्यमंत्र्यांशी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत.

आज मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवार यांची भेटीचं कारण सांगितलं. काल मला पार्थ पवार मला भेटले. काही प्रशासनिक विषय होते, काही राजकीय विषय होते. त्याच्यावर त्यांनी माझ्याशी चर्चा केली, असं फडणवीस यांनी भेटीबाबत सांगितलं. आम्ही मित्रपक्ष आहोत, त्यामुळे ते मला येऊन भेटणे ही काही मोठी बातमी आहे, असं वाटत नाही,असेही फडणवीस म्हणाले. राज्यात कुठलंही ऊर्जा संकट नाही, आपल्याला आवश्यक त्यापेक्षा जास्त ऊर्जा आहे. एखाद्या ठिकाणी कधीतरी ग्रीड फेल्युअर होतं,त्यामुळं काही काळाकरता, काही तासांकरता ऊर्जा संकट तयार होतं. राज्यात भरपूर वीज आहे, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com