Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Heartbreaking Incident in Sambhajinagar: संभाजीनगरमध्ये आई-वडील आणि मुलाचा मृत्यू झाला. आत्महत्या करणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी गेले असता तिघेही डोंगरावरून खाली पडले.
Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले
Sambhajinagar CrimeSaam Tv
Published On
  • संभाजीनगरमध्ये मुलाला वाचवताना आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू

  • तिसगावच्या खडव्या डोंगरावर घडली घटना

  • एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे

  • या घटनेमुळे संभाजीनगर हादरले आहे

छत्रपती संभाजीनगरमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली. डोंगरावरून दरीत पडून आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू झाला. ही घटना संभाजीनगरच्या तिसगाव भागातील खडव्या डोंगरावर घडली. मुलगा आत्महत्या करण्यासाठी डोंगरावर गेला होता. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वडील आणि आई हे देखील डोंगारावरून खाली पडले आणि तिघांचा मृत्यू झाला. डोंगरावर उपस्थित असलेल्या नागरिकांच्या डोळ्यासमोर हा संपूर्ण प्रकार घडला. या घटनेमुळे संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली.

कुणाल मुरलीधर चांदवडे, मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे अशी मृतांची नावे आहेत. १८ वर्षांचा कुणाल हा आई-वडिलांसोबत संभाजीनगरमध्ये राहत होता. आत्महत्या करण्यासाठी कुणाल डोंगरावर गेला होता. तो डोंगरावर गेला असल्याचे कळताच त्याला समजवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी त्याचे आई-वडील आणि गावकरी तिथे गेले. बराच वेळ त्याच्या आई-वडिलांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण मुलगा ऐकण्यास तयार नव्हता. मुलाला वाचवण्यासाठी वडील पुढे गेले आणि त्यांनी मुलाचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात मुलाने डोंगरावरून उडी मारली. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचा तोल गेला आणि ते देखील डोंगरावरून खाली पडले.

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले
Chatrapati Sambhajinagar: ७ महिन्यांच्या चिमुकल्याने गिळले काचेचे तुकडे; संभाजीनगरमधील धक्कादायक घटना, डॉक्टरांनी असा वाचवला जीव

डोंगरावरून खाली पडल्याने गंभीर जखमी होत दोघांचा देखील जागीच मृत्यू झाला. दोघं खाली पडल्याचे पाहून मुलाच्या आईला मोठा धक्का बसला. या धक्क्यात महिलेने देखील डोंगरावरून उडी मारली. त्यांचा देखील मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कुणालने हे टोकाचे पाऊल का उचलले यांचे कारण समजू शकले नाही. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई! मृत व्यक्तीच्या घराची झाडाझडती घेतली, पोलिसांनी दार उघडला, आतील दृश्य बघून हादरले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com