Shocking : होमवर्क न केल्याची शिक्षा जीवावर बेतली! शिक्षिकेच्या मारहाणीनंतर चिमुकल्याचा मृत्यू; Video आला समोर

Visakhapatnam School Teacher Viral Video News : विशाखापट्टणममध्ये गृहपाठ केला नाही म्हणून सहा वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केल्याचा आरोप आहे. CCTV फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांचा तपास सुरू आहे.
Visakhapatnam School 6 Year Old Student Teacher Assault
Visakhapatnam School 6 Year Old Student Teacher AssaultSaam tv
Published On
Summary
  • गृहपाठ न केल्याच्या कारणावरून सहा वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाने केली मारहाण

  • मारहाणीनंतर मुलाचा जागीच मृत्यू

  • घटनेचे CCTV फुटेज समोर

  • पोलीस तपास सुरु

शिक्षकांच्या छडीच्या धाकाने मुलांमध्ये शिस्त लागते असं म्हटलं जात. मात्र या छडीचा धाक मर्यादेपलीकडे गेला तर काय घडू शकते याचं ताजे उदाहरण म्हणजे विशाखापट्टणम येथे घडलेली घटना. विशाखापट्‌टनममध्ये एका सहा वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाने केलेल्या मारहाणीनंतर मुलाची प्रकृती बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेचे CCTV फुटेज समोर आल्यानंतर प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. धक्कादायक म्हणजे होमवर्क केला नाही म्हणून या चिमुकल्याला शिक्षकाने मारहाण केल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलाचे नाव विनय (बदलेल नाव) असून तो लिटिल गार्डन्स स्कूलमध्ये UKG मध्ये शिकत होता. गुरुवारी शाळेत जाण्यापूर्वी त्याने दिलेला होमवर्क म्हणजेच गृहपाठ पूर्ण केला नव्हता. संबंधित शिक्षिकेने वर्गातील मुलांचा गृहपाठ तपासला. मात्र विनयने त्याचा गृहपाठ केला नसल्याचे तिच्या लक्षात आले. या रागात तिने विद्यार्थ्याला मारहाण केली. शाळेतील CCTV फुटेजमध्ये शिक्षक मुलाला मारताना आणि त्याचे कपडे काढण्याचा प्रयत्न करताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे.

Visakhapatnam School 6 Year Old Student Teacher Assault
Hair Care : केसांमधील कोंड्यावर सापडला ५ रुपयांचा उपाय, खोबरेल तेलात मिसळा, एका झटक्यात नाहीसा होईल स्कॅल्पचा त्रास

शिक्षिकेच्या मारहाणीनंतर घाबरलेल्या विनयच्या मनात भीती बसली आणि तो जागीच कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने किंग जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर CCTV फुटेज सोशल मीडियावर समोर आल्याने संपूर्ण प्रकार उघडकीस आला. फुटेज पाहिल्यानंतर कुटुंबीयांनी शिक्षकाविरोधात गंभीर आरोप केले आहेत.

कुटुंबीयांचा दावा आहे की, मारहाणीमुळे आणि निर्माण झालेल्या भीतीमुळे मुलाला हृदयविकाराचा झटका आला असावा. मात्र, मुलाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून CCTV फुटेजची बारकाईने तपासणी केली जात आहे. विनयला यापूर्वी कोणताही आजार होता का, याचीही माहिती घेतली जात आहे. पोस्टमार्टम अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com