Saam Exit Poll : ना प्रचार, ना रॅली, मतदारांचा 'अजितदादां'ना कौल, राज्यात राष्ट्रवादी तिसरा सर्वात मोठा पक्ष

ZP Election: जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज मतदान पार पडला. उद्या निकाल जाहीर होईल. साम टीव्हीचा एक्झिट पोल समोर आला असून यानुसार राज्यात अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष तिसरा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.
Saam Exit Poll : ना प्रचार, ना रॅली, मतदारांचा 'अजितदादां'ना कौल, राज्यात राष्ट्रवादी तिसरा सर्वात मोठा पक्ष
Ajit Pawar Saam tv
Published On

Summary -

  • अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीने कोणताही प्रचार किंवा रॅली न करता निवडणूक लढवली

  • साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार राष्ट्रवादी राज्यात तिसरा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता

  • भाजप आणि शिंदेसेना महायुतीला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज

  • मतदारांनी दुःखाच्या वातावरणातही राष्ट्रवादीला मोठा पाठिंबा दिल्याचे चित्र

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याला मोठा धक्का बसला. २९ जानेवारीला बारामतीत त्यांचे विमान कोसळले. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला. अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जिल्हा परिषद निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेतला होता. या निवडणुकीमध्ये कोणताही प्रचार करायचा नाही आणि रॅली काढायची नाही फक्त पत्रक वाटण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज १२ जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडले. त्याचा उद्या निकाल जाहीर होणार आहे. साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष राज्यात तिसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

Saam Exit Poll : ना प्रचार, ना रॅली, मतदारांचा 'अजितदादां'ना कौल, राज्यात राष्ट्रवादी तिसरा सर्वात मोठा पक्ष
Saam TV exit poll: धुळ्यामध्ये भाजपाची एकहाती सत्ता येणार? पाहा एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. उद्या दुपारपर्यंत कुठल्या जिल्हा परिषदेवर कुणाचा झेंडा फडकेल हे चित्र स्पष्ट होईल. या निवडणुकीच्या मतदानानंतर साम टीव्हीचा एक्झिट पोल समोर आला. त्यानुसार, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये २६३ जागा जिंकण्यात भाजपला यश मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेना शिंदे गटाला १५६ जागा जिंकता येण्याची शक्यता आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ११७ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष तिसरा मोठा पक्ष ठरला आहे.

Saam Exit Poll : ना प्रचार, ना रॅली, मतदारांचा 'अजितदादां'ना कौल, राज्यात राष्ट्रवादी तिसरा सर्वात मोठा पक्ष
Saam TV exit poll: परभणीत सर्वात ठाकरेसेना ठरणार मोठा पक्ष; सत्ता कोणाच्या हाती येणार?

महापालिका निवडणुकीप्रमाणेत जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये देखील महायुतीला मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. महायुतीने महाविकास आघाडीला पुन्हा मागे टाकले. साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार, महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाव्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षाला ५० पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या नाहीत. काँग्रेसला राज्यात ६१ जागा मिळवण्यात यश मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदरात ४८ जागा पडण्याची शक्यता आहे. तर राज ठाकरे यांच्या मनसेला फक्त ६ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर या निवडणुकीत इतर पक्षांना ३७ जागांवर यश मिळू शकते.

Saam Exit Poll : ना प्रचार, ना रॅली, मतदारांचा 'अजितदादां'ना कौल, राज्यात राष्ट्रवादी तिसरा सर्वात मोठा पक्ष
ZP Election Exit Poll : रायगड जिल्हा परिषदेत शिंदेसेना मोठा पक्ष; शेतकरी कामगार पक्षाला धक्का, एक्झिट पोलच्या अंदाजाने खळबळ

दरम्यान, २९ जानेवारीला अजित पवारांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठीच ते बारामतीला निघाले होते. बारामतीमध्ये त्यांच्या ४ सभा होणार होत्या. या सभांसाठी ते मुंबईवरून विमानाने निघाले होते. पण बारामतीत पोहण्यापूर्वीच विमानतळाजवळ त्यांचे विमान कोसळले. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सर्व प्रचार सभा, रॅली रद्द केल्या होत्या.

Saam Exit Poll : ना प्रचार, ना रॅली, मतदारांचा 'अजितदादां'ना कौल, राज्यात राष्ट्रवादी तिसरा सर्वात मोठा पक्ष
ZP निवडणुकीत भाजपचा पाटलांना मोठा धक्का; दोन दशकांचा काँग्रेसचा गड ढासळला? VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com