ZP निवडणुकीत भाजपचा पाटलांना मोठा धक्का; दोन दशकांचा काँग्रेसचा गड ढासळला? VIDEO

Sangli Zilla Parishad Election Exit Poll Analysis: सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपने पाटलांच्या राजकीय गढाला मोठा धक्का दिल्याचे एक्झिट पोलनुसार चित्र आहे.

सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषदच्या 61 जागांसाठी 211 जण रिंगणात होते. तर पंचायत समिती 122 जागांसाठी 327 उमेदवार रिंगणात होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 18 लाख 18 हजार 742 मतदार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी 2 हजार 39 मतदान केंद्रे आणि 9 हजार कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले होते. निवडणुकीच्या निमित्ताने अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी साडे सात वाजल्यापासून 3.30 पर्यंत 46.99 टक्के मतदानाची नोंद झाली.

सांगली जिल्हा पूर्वीपासूनच माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील आणि शरद पवार गटाचे माजी मंत्री जयंत पाटील यांचा गढ होता. मात्र आताच्या निवडणुकीत पाटलांना मोठा धक्का भाजपने दिला आहे असे एक्झिट पोलनुसार सांगली जिल्ह्यामध्ये महायुतीचे पारडे जड दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com