दागिन्यांच्या हव्यासापोटी नातेवाईक महिलेचा निर्घृण खून; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला

Woman Killed For Gold Jewellery In Alibag Maharashtra ;अलिबागमध्ये सोन्याच्या दागिन्यांसाठी नातेवाईक महिलेचा निर्घृण खून करून मृतदेह आंबेनळी घाटात फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
Police and rescue team retrieving the victim’s body from the deep valley of Ambenali Ghat in a shocking Alibag murder case.
Police and rescue team retrieving the victim’s body from the deep valley of Ambenali Ghat in a shocking Alibag murder case.saam tv
Published On

सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी एका नातेवाईक महिलेचा निर्घृण खून करून तिचा मृतदेह आंबेनळी घाटातील खोल दरीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार अलिबाग तालुक्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मांडवा सागरी पोलिसांनी तातडीने दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. सुनंदा पाटील (रा. सारळ, ता. अलिबाग) असे खून झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनदर्श शेडगे आणि रितेश लोहार (दोघे रा. तिनविरा) या दोन तरुणांना अटक केली आहे.

Police and rescue team retrieving the victim’s body from the deep valley of Ambenali Ghat in a shocking Alibag murder case.
Pune News: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, पण बाहेर आलेच नाहीत; पुण्यात तिघांचा बुडून मृत्यू

सोन्याच्या दागिन्यांसाठी रचला कट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सुनंदा पाटील यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटण्याच्या उद्देशाने आरोपींनी हा थरारक कट रचला. आरोपींनी सुनंदा यांना बहाण्याने घरी बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना एका निर्जन स्थळी नेऊन त्यांचा गळा आवळून खून केला. गुन्हा लपवण्यासाठी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह थेट महाबळेश्वरजवळील दुर्गम अशा आंबेनळी घाटात नेऊन खोल दरीत फेकून दिला.

Police and rescue team retrieving the victim’s body from the deep valley of Ambenali Ghat in a shocking Alibag murder case.
Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात यश

महिला बेपत्ता झाल्यानंतर मांडवा सागरी पोलिसांनी तपास चक्र फिरवली. संशयावरून अनदर्श शेडगे आणि रितेश लोहार यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींनी मृतदेह आंबेनळी घाटात टाकल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. घाटातील दरी अत्यंत खोल आणि दुर्गम असल्याने स्थानिक सर्च आणि रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले होते. रेस्क्यू टीमच्या जवानांनी जीवाची बाजी लावून खोल दरीतून मृतदेह यशस्वीरीत्या बाहेर काढला.

Police and rescue team retrieving the victim’s body from the deep valley of Ambenali Ghat in a shocking Alibag murder case.
मंत्री छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? राजकीय घडामोडींना वेग|VIDEO

तेवाईकांनीच पैशांच्या आणि सोन्याच्या लालसेपोटी हे कृत्य केल्याने अलिबाग परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मांडवा सागरी पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या असून, या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com