Pune News: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, पण बाहेर आलेच नाहीत; पुण्यात तिघांचा बुडून मृत्यू

3 People dead While Swimming In Dam: पुण्यामध्ये तिघांना पाण्यात बुडून मृत्यू झाला. पहिल्या घटनेत शिरोता धरणात पोहताना तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत मुळा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला.
Pune News: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, पण बाहेर आलेच नाहीत; पुण्यात तिघांचा बुडून मृत्यू
3 People dead While Swimming In DamSaam Tv
Published On
  • पुण्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू

  • शिरोटा डॅममध्ये बुडून २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

  • मुळा नदीत तरुणाचा बुडून मृत्यू

  • या घटनेमुळे पुण्यात हळहळ व्यक्त केली जात आहे

दिलीप कांबळे, मावळ

पुण्यामध्ये एकाच दिवशी तिघांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मावळच्या शिरोटा डॅममध्ये पर्यटनासाठी आलेल्या २ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. हे दोघे पुण्यातील होते. तर दुसऱ्या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला. मुळशी तालुक्यातील मुलखेड येथे मुळा नदीपात्राशेजारी मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे पुण्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कामशेत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिरोटा डॅम येथे पर्यटनासाठी आलेल्या ६ विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पुण्याहून ६ विद्यार्थी शिरोता डॅम परिसरात फिरण्यासाठी आले होते. दरम्यान, डॅममधील पाण्याचा अंदाज न आल्याने दोन विद्यार्थी पाण्यात बुडाले. बुडालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आर्य सुशांत बंडावर ही विद्यार्थिनी गोंदिया येथील असून करण ज्ञानदेव ठोंबरे हा विद्यार्थी सातारा जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Pune News: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, पण बाहेर आलेच नाहीत; पुण्यात तिघांचा बुडून मृत्यू
Pune : महिला पोलीस अधिकारी लाच घेताना रंगेहाथ सापडली; ACB ने आवळल्या मुसक्या

घटनेची माहिती मिळताच कामशेत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पोहचण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी दोघांना वाचवण्याचा प्रयत्न करत पाण्याबाहेर काढले. मात्र, त्यांचा जीव वाचवण्यात अपयश आले. या प्रकरणाचा पुढील तपास कामशेत पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे मृतांच्या सोबत असलेल्या तरुणांना मोठा धक्का बसला.

दरम्यान, दुसरी घटना मुळशी तालुक्यातील मुलखेड येथे मुळा नदी पात्राशेजारी मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पंकज भिमराव केदारी (वय ३६ वर्षे) असे मृत तरुणाचे नाव असून तो पुण्यातील पाषाणमध्ये राहत होता. पंकज शनिवारी दुपारी मित्रासह मुलखेड येथे मुळा नदी पात्राशेजारी पार्टी करत असताना नदीपात्रात उतरला. यावेळी अचानक तो पाण्यात बुडू लागला. काही वेळाने तो दिसेनासा झाला. घटनेनंतर स्थानिकांसह त्याच्या मित्रांनी ही माहिती मुळशीतील पौड पोलिस ठाण्याला दिली.

Pune News: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, पण बाहेर आलेच नाहीत; पुण्यात तिघांचा बुडून मृत्यू
Pune Accident Black Spot: पुणे शहरासह जिल्ह्यात अपघात वाढले! जीवघेणे ६३ ब्लॅक स्पॉट; 'या' रस्त्यांवर होतात सर्वाधिक अपघात

त्यानंतर पोलिस हे मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मात्र रात्री अंधार पडल्यामुळे शोधकार्य होऊ शकले नाही. त्यानंतर आज सकाळी पंकजचा मृतदेह मुळा नदीच्या पाण्यावर तरंगत असल्याचे स्थानिक सरपंच आणि पोलिस पाटील यांनी पोलिसांना कळवले. मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून पंकज केदारी यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय पौड येथे शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.

Pune News: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, पण बाहेर आलेच नाहीत; पुण्यात तिघांचा बुडून मृत्यू
Hidden Pune Tourism : पुण्याजवळील Hidden मिनी गोव्यासारखं ठिकाण कधी पाहिलंय का? या विकेंडला नक्की करा प्लान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com