हमीरपूरमध्ये राष्ट्रीय महामार्ग ३४ वर भीषण कार अपघात झाला.
बागेश्वर धामहून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला.
चालकाला झोप लागल्याने किंवा ओव्हरटेक करताना अपघात झाल्याचा संशय.
उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एक भंयकर अपघात झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग ३४ वर झालेल्या या भीषण अपघातात पती-पत्नीसह पाच जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, बागेश्वर धामच्या तीर्थयात्रेवरून परतताना कारचा अपघात झाला. अपघातातील पाच जणांच्या मृत्यूमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ही दुर्घटना मौदाहा कोतवाली परिसरातील चिरका आणि मावैया गावांदरम्यान घडली. पोलिसांनी सांगितले की, हा भीषण अपघात राष्ट्रीय महामार्ग ३४ वर झाला असून मारुती वॅगनआर कारमधील एकाच कुटुंबातील दोन जोडप्यांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. कारचा अपघात झाल्यानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली.
मृत झालेले पाच जण मृत व्यक्ती बागेश्वर धामहून कानपूरला जात होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, चालकाला झोप लागल्याने किंवा ओव्हरटेकिंग करताना हा अपघात झाला असावा, असा संशय व्यक्त केला जातोय.अपघातानंतर स्थानिक पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातात ठार झालेल्या पाच जणांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. मृत व्यक्ती कानपूर जिल्ह्यातील होते. तर कार चालक लखनौ जिल्ह्यातील होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.