Dog Mediclame: आता कुत्र्याचाही मेडिक्लेम?, कुत्रा चावला तरी मिळणार भरपाई

Pet Health Insurance: आता कुत्र्याचाही मेडिक्लेम असणार आहे. शस्त्रक्रिया आणि उपचारांवरील ८० टक्के खर्च विम्यातून मिळणार आहे. कुत्रा चावला तरी भरपाई मिळणार आहे.
Dog Mediclame: आता कुत्र्याचाही मेडिक्लेम?, कुत्रा चावला तरी मिळणार भरपाई
Dog MediclameSaam Tv
Published On

Summary -

  • आता पाळीव कुत्र्यांसाठी मेडिक्लेम पॉलिसी उपलब्ध

  • शस्त्रक्रिया आणि उपचारांवरील ८० टक्के खर्च विम्यातून मिळणार

  • वार्षिक प्रीमियम २००० ते २५००० दरम्यान असेल

  • कुत्रा चावल्यास पीडिताला विम्यातून भरपाई

  • पाळीव प्राण्यांच्या आरोग्यासाठी मोठा दिलासा

सुप्रीम मसकर, साम टीव्ही

तुम्ही तुमच्या लाडक्या डॉगीचा मेडिक्लेम काढलाय का? पाळीव कुत्रा आजार पडल्यावर होणारा लाखोंचा खर्च तुम्हाला वाचवायचा आहे का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता कुत्र्याचाही मेडिक्लेम काढता येणार आहे? तो कसा पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

मेडीक्लेम आता तुमच्या- आमच्या पुरताच मर्यादीत राहिलेला नाही तर ते आता तुमच्या घरातील पाळीव कुत्र्यापर्यंत पोचलाय. जर तुमचा लाडका डॉगी आजारी पडला तर तर आता त्याचाही मेडिक्लेम निघणार आहे! होय तुम्ही बरोबर ऐकलतं. गंभीर आजार असो वा शस्त्रक्रिया तुमच्या पाळीव कुत्र्याचा खर्च आता विमा कंपनी उचलणार आहे. 'पेट मेडिक्लेम' नेमकं आहे काय? तर

Dog Mediclame: आता कुत्र्याचाही मेडिक्लेम?, कुत्रा चावला तरी मिळणार भरपाई
Dogs Barking: रात्रीच्या वेळी कुत्री का भुंकतात? हे कारण वाचून बसेल धक्का

श्वानाच्या शस्त्रक्रियेवर होणाऱ्या खर्चापैकी 80 टक्के वाटा आता विमा कंपनी देणार आहे. 47 प्रकारचे विशिष्ट आजार आणि 21 ओपीडी उपचारांचा यात समावेश असणार आहे. 14 प्रकारच्या अद्ययावत थेरपींसाठी विमा कंपनीकडून आर्थिक मदत मिळणार आहे. कुत्र्याच्या जाती, वय आणि बाजारमूल्यानुसार मेडिक्लेमचा प्रीमियम ठरेल. पॅकेजनुसार वार्षिक प्रीमियम 2 हजार ते 25 हजार रुपये असेल. वार्षिक प्रीमियमवर 40 हजार ते दीड लाखांपर्यंतचे कव्हर मिळणार आहे.

Dog Mediclame: आता कुत्र्याचाही मेडिक्लेम?, कुत्रा चावला तरी मिळणार भरपाई
Dog Behavior: कुत्री लहान मुलांना पाहून चावायला का येतात? जाणून घ्या खरी कारणं

नागपुरमध्ये झालेल्या भारतीय श्वान चिकित्सक संघटनेच्या वार्षिक अधिवेशनात याची माहिती देण्यात आली. पाळीव कुत्रा एखाद्याला चावला तर पीडित व्यक्तीला विम्याच्या रक्कमेतून भरपाई देण्यात येणार आहे. त्यामुळे महानगरांत पाळीव प्राण्यांची संख्या वाढत असताना मेडिक्लेममुळे मालकांच्या खिशाला कात्री लागणार नाही आणि पाळीव कुत्र्याच्या आरोग्याशीही खेळ होणार नाही हे निश्चित...

Dog Mediclame: आता कुत्र्याचाही मेडिक्लेम?, कुत्रा चावला तरी मिळणार भरपाई
Dogs Breeds: जगातील सर्वात महाग कुत्र्यांच्या प्रजाती तुम्हाला माहिती आहेत का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com