Dogs Breeds: जगातील सर्वात महाग कुत्र्यांच्या प्रजाती तुम्हाला माहिती आहेत का?

Shruti Vilas Kadam

तिबेटियन मॅस्टिफ (Tibetan Mastiff)

जगातील सर्वात महागड्या कुत्र्यांपैकी एक. याची किंमत कोट्यवधी रुपयांपर्यंत जाऊ शकते. मोठे शरीर, जाड फर आणि राजेशाही लूक यासाठी प्रसिद्ध.

Tibetan Mastiff | Saam Tv

समोयेड (Samoyed)

पांढऱ्या, मऊ फरमुळे ओळखला जाणारा हा कुत्रा दिसायला अत्यंत गोंडस असतो. किंमत साधारण 8 ते 12 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

Samoyed | Saam Tv

चाऊ चाऊ (Chow Chow)

सिंहासारखा लूक आणि निळी जीभ हे याचे वैशिष्ट्य. दुर्मिळ असल्याने याची किंमत 6 ते 10 लाख रुपयांपर्यंत जाते.

Chow Chow | Saam Tv

लोचेन (Lowchen)

जगातील दुर्मिळ कुत्र्यांच्या जातींपैकी एक. ‘लिटल लायन डॉग’ म्हणून ओळखला जातो. किंमत 7 ते 9 लाख रुपये.

Lowchen | Saam Tv

अकिता (Akita)

जपानमधील ही जात निष्ठा आणि ताकदीसाठी प्रसिद्ध आहे. याची किंमत साधारण 5 ते 8 लाख रुपयांपर्यंत असते.

Akita | Saam tv

फॅरोह हाउंड (Pharaoh Hound)

अतिशय आकर्षक आणि बुद्धिमान कुत्रा. दुर्मिळ असल्याने याची किंमत 5 ते 7 लाख रुपयांपर्यंत जाते.

Pharaoh Hound Dogs Breeds | Saam Tv

डोगो अर्जेंटिनो (Dogo Argentino)

मजबूत शरीरयष्टी आणि शौर्य यासाठी ओळखला जाणारा हा कुत्रा महागड्या जातींपैकी एक आहे. किंमत 4 ते 6 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

Dogo Argentino | Saam Tv

Kiwi Benefits: आठवड्यातून 2 वेळा किवी खल्ल्याने कोणते फायदे होतात?

Kiwi | yandex
येथे क्लिक करा