Sakshi Sunil Jadhav
कुत्र्यांसोबत लहान मुलांना खेळायला खूप आवडतं. पण अलीकडेच लहान मुलांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना समोर येत आहेत. ही अतिशय चिंताजनक बाब आहे.
तज्ज्ञांनी याची काही माहिती दिली आहे. त्याचा वापर करुन तुम्ही लहान मुलांना वाचवू शकता. यामध्ये कुत्री आक्रमक होण्याचे कारण स्पष्ट केले आहे.
लहान मुलं कुत्र्यांच्या उंची एवढीच असतात. मुलांना हात-पाय हलवण्याची, धावण्याची किंवा ओरडण्याची सवय असते. याची भीती कुत्र्यांना वाटते. म्हणून ते बचावासाठी हल्ला करतात.
लहान मुलांचे रडणे, किंचाळणे किंवा अचानक मोठ्याने हसणे कुत्र्यांच्या संवेदनशील कानांना त्रासदायक वाटतं म्हणून ते हल्ला करु शकतात.
मुलं कुत्र्याला पाहून घाबरली तर त्यांची भीती कुत्र्यांना जाणवते. त्यामुळे कुत्रा स्वतःच्या बचावासाठी हल्ला करू शकतो.
रस्त्यावरचे कुत्रे आपला परिसर सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात. मुलं अनोळखी असेल तर ते आक्रमक होऊ शकतात.
काही वेळा मुलं कुत्र्याची शेपटी ओढणे, कान पकडणे याला खेळ समजतात, पण कुत्र्यांना तो छळ वाटतो.
जखमी, आजारी किंवा भुकेले कुत्रे जास्त तापट असतात आणि पटकन चावू शकतात.
पिल्ल्यांसोबत असलेली कुत्री जास्त आक्रमक असते. पिल्ल्यांच्या जवळ लहान मुलं गेल्यावर ती हल्ला करू शकते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.