Archana Puran Singh: अर्चना पूरन सिंहला झालेला गंभीर CRPS आजार नेमका आहे तरी काय? जाणून घ्या एका क्लिकवर

Sakshi Sunil Jadhav

लोकप्रिय अभिनेत्री

टीव्ही-सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अर्चना पूरन सिंह सध्या एका दुर्मिळ आणि गंभीर आजाराशी झुंज देत आहेत.

CRPS disease

CRPS म्हणजे काय?

अर्चना यांना झालेल्या आजाराचे नाव कॉम्प्लेक्स रिजनल पेन सिंड्रोम (CRPS)आहे. हा एक गंभीर न्यूरोलॉजिकल आजार असून, यामध्ये जखम बरी झाल्यानंतरही वेदना थांबत नाहीत, उलट वाढत जातात.

Complex Regional Pain Syndrome

वेदनांच कारण काय?

CRPS मध्ये नर्व सिस्टीम बिघडतं. त्यामुळे मेंदूकडे जाणाऱ्या वेदनांचे सिग्नल सतत अॅक्टीव्ह राहतात. यामुळे शरीराच्या एका भागात प्रचंड वेदना, जळजळ आणि सूज जाणवते.

CRPS symptoms

आजाराचं मुळ कारण

हा आजार हाडं तुटणे, शस्त्रक्रिया,जखम, नसांना इजा किंवा प्लास्टरमुळे होऊ शकतो. हात, पाय, मनगट किंवा गुडघ्यांवर याचा जास्त परिणाम होतो.

, CRPS causes

आजाराची लक्षणे

CRPS ची लक्षणे सामान्य वेदनांपेक्षा वेगळी असतात. हलक्या स्पर्शालाही तीव्र वेदना, आग लागल्यासारखी जळजळ, सूज, त्वचेचा रंग व तापमान बदलणे, सांध्यात कडकपणा अशी लक्षणे दिसतात.

neurological disorder

व्लॉग व्हायरल

अर्चना पूरन सिंग यांनी त्यांच्या व्लॉगमध्ये या वेदनांबद्दल सांगितले. त्यावेळेस भावूक होत त्यांना अश्रू अनावर झाले. हा आजार फक्त शारीरीकच नाही तर मानसिकदृष्ट्याही रुग्णाला खचवतो.

neurological disorder

आजारावर उपाय काय?

CRPS ला ठोस इलाज नसला, तरी फिजिओथेर, Pain Management, औषधोपचार आणि योग्य काळजी घेतल्याने वेदनांवर नियंत्रण मिळवता येतं.

chronic pain disease

तज्ज्ञांचे मत

तज्ज्ञांच्या मते, वेळीच आजार ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लवकर उपचार सुरू केल्याने CRPS चा त्रास कमी होऊ शकतो.

chronic pain disease

NEXT: Eyeliner Tips: परफेक्ट आयलाइनर कसं लावायचं? जाणून घ्या 8 सोप्या स्टेप्स

how to apply eyeliner
येथे क्लिक करा