कॉकरोच जनता पार्टीची ताकद वाढणार; OBC चा बडा नेता प्रवेश करणार? राजकारण फिरणार?

Laxman Hake Support Cockroach Janata Party Maharashtra: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी कॉकरोच जनता पार्टीला समर्थन देण्याची तयारी दर्शवल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
OBC leader Laxman Hake speaks to media in Sangli, expressing support for the emerging youth-led “Cockroach Janata Party”.
OBC leader Laxman Hake speaks to media in Sangli, expressing support for the emerging youth-led “Cockroach Janata Party”.saam tv
Published On

राज्यातील प्रस्थापित नेत्यांना आणि राजकीय व्यवस्थेला धडा शिकवण्यासाठी मी प्रसंगी 'कॉकरोच जनता पार्टी'चा सदस्य होण्यासही तयार आहे असे खळबळजनक विधान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केले आहे. सांगली येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले असून, सध्या त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

OBC leader Laxman Hake speaks to media in Sangli, expressing support for the emerging youth-led “Cockroach Janata Party”.
Maharashtra Politics: मोठी बातमी! काँग्रेसच्या २ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकीय वर्तुळात खळबळ

लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी बोलताना प्रस्थापित राजकारण्यांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, मी कॉकरोच पार्टीचे पूर्ण समर्थन करतो. प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी कोणताही मोठा कारखानदार किंवा धनदांडगा माणूस पुढे येणार नाही. ही लढाई सामान्य तरुणाईलाच लढावी लागणार आहे. हीच तरुणाई प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून देईल आणि या परिवर्तनासाठी मी या तरुणांसोबत जाण्यास पूर्णपणे तयार आहे.

OBC leader Laxman Hake speaks to media in Sangli, expressing support for the emerging youth-led “Cockroach Janata Party”.
Rahul Gandhi In Thane News | राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज ठाण्यात | Marathi News

प्रस्थापित विरुद्ध बहुजन संघर्ष तीव्र होणार?

गेल्या काही काळापासून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाके सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत. प्रस्थापित राजकारण्यांमुळेच बहुजन आणि ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी वारंवार केला आहे. त्यातच आता त्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे आगामी काळात प्रस्थापित विरुद्ध बहुजन असा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

OBC leader Laxman Hake speaks to media in Sangli, expressing support for the emerging youth-led “Cockroach Janata Party”.
उड्डाणपूल प्रकल्पावरून कल्याणमध्ये संघर्ष; बुद्धभूमी फाउंडेशनची न्यायाची मागणी

सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी तरुणांना झुरळ असे संबोधित केल्यानंतर अभिजीत दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली आणि अवघ्या काही तासांत याला मोठा प्रतिसाद मिळाला. नीटफूटी प्रकरणी काल अभिजीत दिपके यांनी मोठे आंदोलन केले आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची मागणी केली. तसेच आज देखील त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्या निवासस्थानी येत ही लढाई सुरूच असणार असल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com