Maharashtra Politics: मोठी बातमी! काँग्रेसच्या २ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Legislative Council election: विधान परिषद निवडणुकीदरम्यान काँग्रेसने मोठी कारवाई केली. दोन बड्या नेत्यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी केली. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
Maharashtra Politics: मोठी बातमी! काँग्रेसच्या २ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकीय वर्तुळात खळबळ
Congress Saam tv
Published On
  • विधान परिषद निवडणुकीदरम्यान काँग्रेसकडून मोठी कारवाई

  • काँग्रेसने दोन बड्या नेत्यांची केली हकालपट्टी

  • साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांचे निलंबन

  • दोघांनी पक्ष नेतृत्वाला न सांगता उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचा आरोप

विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान काँग्रेसमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. या निवडणुकीत उमेदवारी दिलेल्या नेत्यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे काँग्रेसने त्यांच्याविरोधात कारवाई केली आहे. दोन बड्या नेत्यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली. या आधी महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना ठाकरे गटाने ३ बड्या नेत्यांचे निलंबन केले होते. त्यानंतर आता काँग्रेसकने मोठी कारवाई करत २ बड्या नेत्यांचे निलंबन केले.

विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेणारे यवतमाळचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Maharashtra Politics: मोठी बातमी! काँग्रेसच्या २ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकीय वर्तुळात खळबळ
MLC Election : ठाण्यात शिंदेंच्याच शिवसेनेचा विजय निश्चित, एक फोन अन् पवारांची अचानक माघार

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधान परिषद मतदारसंघातून काँग्रेसने शैलेश अग्रवाल यांना उमेदवारी दिली होती. तर यवतमाळ विधान परिषद मतदारसंघातून साहेबराव कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवत या दोघांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे पक्ष सदस्यत्व रद्द करण्यात आले. पक्षासमोर अडचणी निर्माण केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

Maharashtra Politics: मोठी बातमी! काँग्रेसच्या २ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकीय वर्तुळात खळबळ
MLC Eletion: मोठी बातमी! ऐनवेळी निवडणुकीतून माघार, ठाकरेंनी थेट अ‍ॅक्शन घेतली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com