MLC Election : ठाण्यात शिंदेंच्याच शिवसेनेचा विजय निश्चित, एक फोन अन् पवारांची अचानक माघार

Thane MLC Election Abhijit Pawar : ठाणे विधान परिषद निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड. शरद पवार गटाचे उमेदवार अभिजित पवार यांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिंदेसेनेचे रवींद्र फाटक यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde saam tv
Published On

Thane MLC Election, Ravindra Phatak : विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणुका लागल्या असून, याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. त्यातच ठाण्यातील विधान परिषदेची जागा कोण जिंकणार, याचीही चर्चा सुरू झाली होती. नुकतीच 'साम टीव्ही'च्या हाती आलेल्या माहितीनुसार, ठाण्यात शिवसेनेचे रवींद्र फाटक यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे; कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मविआ आणि महायुती यांच्यात रंगतदार लढत होईल, असा अंदाज वर्तवला जात होता.

ठाणे विधान परिषद निवडणुकीमधून महाविकास आघाडीच्या उमेदवाराने अचानक एक्झिट घेतल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. मविआकडून १७ जागांवर उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला गेला होता, पण २ दिवसांत २ उमेदवारांनी माघार घेतल्याने विरोधकांना स्वतःवर विश्वास राहिला नाही का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

बुधवारी अमरावतीमधील एका उमेदवाराने अचानक अर्ज माघारी घेतला होता, तर आज ठाण्यातील उमेदवाराने तलवार म्यान केली. यामुळे ठाण्यात सध्या एकच चर्चा सुरू झाली आहे.

Eknath Shinde
आनंदवार्ता! अखेर मान्सून केरळमध्ये धडकला, महाराष्ट्रात कधी पोहचणार? तारखा आतच नोट करा

महायुतीकडून रवींद्र फाटक हे ठाणे विधान परिषदेसाठी उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. पण पवार यांनी आज अचानक उमेदवारी मागे घेतल्याने खळबळ उडाली आहे.

'साम टीव्ही'ला मिळालेल्या वृत्तानुसार, अभिजीत पवार यांनी राष्ट्रवादी पक्षातील एका बड्या नेत्याच्या सांगण्यावरून माघार घेतली आहे. त्यामुळे आता ठाणे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही रिपोर्ट्सनुसार, वैयक्तिक कारणांमुळे अभिजित पवार यांनी अर्ज मागे घेतला आहे.

Eknath Shinde
LPG Rate : ९१३ रुपयांचा गॅस सिलिंडर थेट ५८७ रुपयांना! तुम्हाला मिळणार का फायदा? पाहा नियम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com