Fort In Kolhapur : रणनीती, लढाई अन् समर्पण, कोल्हापूरला गेल्यावर न विसरता पाहा 'हा' ऐतिहासिक किल्ला

Shreya Maskar

कोल्हापूर

विशाळगड हा कोल्हापूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे, जो मराठा साम्राज्याचा महत्त्वाचा बालेकिल्ला होता.

Kolhapur Tourism | google

विशाळगड उंची

विशाळगड समुद्रसपाटीपासून ३,५०० फूट उंचीवर आहे. हा किल्ला पावनखिंडीच्या लढाईसाठी प्रसिद्ध आहे. विशाळगड हा मराठा साम्राज्याचा एक महत्त्वाचा लष्करी तळ होता.

Vishalgad | google

पावनखिंडीची लढाई

विशाळगड मराठा इतिहासातील शौर्य आणि संघर्षाचे प्रतीक मानला जातो. पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुखरूप बाहेर पडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना विशाळगडावर पोहोचवण्यासाठी बाजीप्रभूंनी जीवाची बाजी लावली होती.

The Battle of Pavan Khind | google

ट्रेकिंग

विशाळगडावर साहसी ट्रेकिंगचा अनुभव घेता येतो. येथे पावसाळ्यात जाणे टाळा. तुम्ही उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात येथे आवर्जून जाऊ शकता. हिवाळ्यात चढाई करणे सोपे आहे.

Trekking | pinterest

किल्ला कोणी बांधला?

विशाळगड हा ऐतिहासिक किल्ला साधारणपणे अकराव्या-बाराव्या शतकात शिलाहार घराण्यातील राजा भोज दुसरा याने बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये आदिलशाहीकडून जिंकून घेतला.

fort | google

पर्यटन स्थळे

विशाळगडाजवळ आंबा घाट, पावनखिंड , अमृतेश्वर मंदिर , पाळेश्वर धबधबा, पन्हाळा किल्ला ही पर्यटन स्थळे आहेत.

Tourist Attractions | pinterest

कसं जालं?

तुम्ही छत्रपती शाहू महाराज टर्मिनसला उतरून पुढे रिक्षा किंवा बसने विशाळगडाच्या पायथ्याशी पोहचाल.

How to Get There? | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

disclaimer | google

NEXT : लोणावळा-खंडाळा विसरा! तळेगावहून हाकेच्या अंतरावर आहे 'हे' हिल स्टेशन, प्रवासाचा ताण विसरून जाल

Talegaon Tourism | pinterest
येथे क्लिक करा...