Talegaon Tourism : लोणावळा-खंडाळा विसरा! तळेगावहून हाकेच्या अंतरावर आहे 'हे' हिल स्टेशन, प्रवासाचा ताण विसरून जाल

Shreya Maskar

तळेगाव

पाचगणी हे तळेगाव दाभाडे (पुणे) पासून सुमारे १०० ते १३० किलोमीटर अंतरावर असलेले एक लोकप्रिय आणि सुंदर हिल स्टेशन आहे.

Talegaon | pinterest

पाचगणी हिल स्टेशन

पाचगणी हे ठिकाण पाच टेकड्यांनी वेढलेले आहे. जे सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरच्या जवळ वसलेले आहे. येथे सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Panchgani Hill Station | pinterest

भारताची स्ट्रॉबेरी गार्डन

पाचगणी थंड हवेचे ठिकाण हे 'भारताची स्ट्रॉबेरी गार्डन' म्हणूनही ओळखले जाते. कारण भारतातील स्ट्रॉबेरीचे सर्वाधिक उत्पादन याच भागात घेतले जाते. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूटचा आनंद घेऊ शकता.

India's Strawberry Garden | pinterest

पर्यटन स्थळे

पाचगणी हे हिल स्टेशन 'टेबल लँड', 'केटस् पॉइंट', 'सिडनी पॉइंट' , 'मॅप्रो गार्डन' आणि दरीची विहंगम दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. पाचगणीजवळ धोम धरण आहे.

Tourist Attractions | pinterest

साहसी खेळ

टेबल लँड आणि आसपासच्या खोऱ्यांमध्ये पॅराग्लायडिंग, ट्रेकिंग आणि हायकिंगचा आनंद घेऊ शकतो. लहान मुलांना येथे तुफान मजा-मस्ती करता येईल.

Adventure Sports | pinterest

हस्तकला

पाचगणी येथे देवराई आर्ट व्हिलेज आहे. आदिवासी कला, दगडी आणि लोखंडी हस्तकलेसाठी ओळखले जाते.

Handicrafts | pinterest

महाबळेश्वर

महाबळेश्वर 'भारताची स्ट्रॉबेरी राजधानी' म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील एक प्रमुख आणि निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर प्रसिद्ध आहे.

Mahabaleshwar | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

disclaimer | pinterest

NEXT : साताऱ्यातील 'हे' गड-किल्ले आयुष्यात एकदा तरी पाहाच

Satara Tourism | SAAM TV
येथे क्लिक करा...