Shreya Maskar
सातारा हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. 'कास पठारा'मुळे महाराष्ट्राची 'फुलांची दरी' म्हणून जाते. सातारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याची राजधानी म्हणून लाभलेल्या समृद्ध मराठा इतिहासामुळे प्रसिद्ध आहे.
प्रतापगड किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरपासून सुमारे २४ किमी अंतरावर वसलेला एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. प्रतापगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता.
घनदाट जंगले आणि 'कोयना वन्यजीव अभयारण्या'ने वासोटा किल्ला वेढलेला आहे. ट्रेकिंगसाठी वासोटा किल्ला हे लोकप्रिय ठिकाण आहे.
कल्याणगडला नंदगिरी किल्ला असेही म्हणतात. हा किल्ला सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यात आहे.हा किल्ला शिलाहार राजा भोज (दुसरा) याने बांधला होता. पुढे १६७३ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला.
चंदन-वंदन किल्ले सातारा जिल्ह्यामध्ये भुईंज गावाजवळ स्थित असलेले ऐतिहासिक जुळे (twin) किल्ले आहेत. हे किल्ले पुणे-सातारा महामार्गावर, वाई तालुक्यात येतात आणि सह्याद्रीच्या महादेव डोंगररांगेत वसलेले आहेत.
अजिंक्यतारा किल्ला सातारा शहराला वेढणाऱ्या सात डोंगरांपैकी एकावर वसलेला आहे. अजिंक्यतारा किल्ला प्रामुख्याने १२ व्या शतकात कोल्हापूरच्या शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज याने बांधला.
'सज्जनांचा गड' म्हणून सज्जनगड किल्ला ओळखला जातो. हा इतिहासातील महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी एक आहे.
साताऱ्याला अनेक सुंदर पर्यटन स्थळे आहे. यात महाबळेश्वर, पाचगणी, कास पठार, ठोसेघर धबधबा आणि प्रतापगड यांसारखी जगप्रसिद्ध ठिकाणे आहेत.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.