Ahilyanagar Tourism : कोकण कड्याची भव्यता अन् सह्याद्रीतील थरार; करा 'या' ऐतिहासिक किल्ल्याचा रोमांचक प्रवास

Shreya Maskar

हरिश्चंद्रगड

हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील अकोले तालुक्यात, माळशेज घाटाच्या जवळ वसलेला एक अत्यंत प्राचीन आणि प्रसिद्ध डोंगरी किल्ला आहे.

Harishchandragad | google

प्रमुख्य वैशिष्ट्ये

१६ व्या शतकातील हरिश्चंद्रगड किल्ला 'कोकण कडा' आणि 'केदारेश्वर गुंफे'साठी विशेष प्रसिद्ध आहे. हरिश्चंद्रगड किल्ल्यावरून 'कोकण कडा' दिसतो.

Key Features | google

माळशेज घाट

हरिश्चंद्रगड माळशेज घाट परिसरात वसलेले एक प्रमुख ट्रेकिंग स्पॉट आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी प्रामुख्याने खिरेश्वर किंवा पाचणे या गावांच्या मार्गांचा वापर केला जातो.

Malshej Ghat | google

कधी भेट द्यावी?

पावसाळा आणि हिवाळ्यात ट्रेकिंग करण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. तसेच तुम्ही उन्हाळ्यातही किल्ला पाहायला जाऊ शकता.

Fort | google

स्थापत्यशैली

हरिश्चंद्रगडावरील हेमाडपंती स्थापत्यशैली, तारामती शिखरावरून दिसणारी विहंगम दृश्यांसाठी हा किल्ला प्रसिद्ध आहे.

Fort | google

कोकण कडा

कोकण कडा म्हणजे एक विशाल, अर्ध वर्तुळाकार आणि पुढे आलेला कडा होय. येथून कोकण प्रदेशाचे विहंगम दृश्य दिसते. ८० अंशांच्या सरळसोट उतारासाठी हा कडा विशेष प्रसिद्ध आहे.

Konkan kada | google

केदारेश्वर गुंफा मंदिर

हरिश्चंद्रगड किल्ल्यात केदारेश्वर गुंफा मंदिर आहे. या गुंफेत ५ फूट उंचीचे शिवलिंग असून ते थंडगार पाण्याने वेढलेले असते. या ठिकाणी चार पौराणिक खांब होते. हे चार खांब चार युगांचे (सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग) प्रतीक मानले जातात.

Kedareshwar Cave Temple

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

disclaimer

NEXT : कठीण चढाई पण अद्भुत नजारे; नाशिकमध्ये लपलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला

Nashik Tourism | google
येथे क्लिक करा...