Shreya Maskar
हरिहर किल्ला (हर्षगड) हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक ऐतिहासिक गिरीदुर्ग आहे, जो त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि ८० अंशांच्या तीव्र उताराच्या, खडकात कोरलेल्या पायऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे.
नाशिकपासून सुमारे ४० किमी आणि इगतपुरीपासून ४८ किमी अंतरावर हरिहर किल्ला वसलेला आहे. या किल्ल्याच्या ट्रेकिंगसाठी निर्गुडपाडा आणि हर्षेवाडी ही पायथ्याची गावे आहेत.
हरिहर किल्ला हा यादव वंशाच्या काळात बांधला गेला आहे. हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीत होता आणि पुढे १६७० मध्ये तो मराठा साम्राज्यात (शिवरायांच्या काळात) आला.
हरिहर किल्ल्याला भेट देण्यासाठी हिवाळा किंवा उन्हाळ्यातील पहाटेची वेळ ही सर्वोत्तम मानली जाते. तुम्हाला येथे ट्रेकिंग करताना निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळेल.
हरिहर किल्ला हर्षगड या नावाने देखील ओळखला जातो. हरिहर किल्ल्यावर ट्रेकिंगचा थरारक अनुभव मिळतो.
हरिहर किल्ला ९ व्या ते १४ व्या शतकातील आहे. किल्ला त्याच्या अद्वितीय त्रिकोणी आकारासाठी, सह्याद्री पर्वतरांगेच्या विहंगम दृश्यांसाठी आणि व्यापारी मार्गांवर नियंत्रण ठेवण्याच्या ऐतिहासिक महत्त्वासाठी ओळखला जातो.
हरिहर किल्ल्यावर एक छोटे हनुमान मंदिर, एक शिव मंदिर आहे. येथे तुम्हाला शांत वातावरण अनुभवता येईल. तसेच सुंदर फोटो देखील तुम्ही काढू शकता.
नाशिक येथे अनेक सुंदर पर्यटन स्थळे आहेत. यात पंचवटी, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, काळाराम मंदिर, आणि रामकुंड ही मुख्य आकर्षणे आहेत. याशिवाय, पांडव लेणी, अंजनेरी टेकड्या, सोमेश्वर धबधबा देखील आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.