Shreya Maskar
कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुका विजयदुर्ग किल्ला वसलेला आहे. हा ऐतिहासिक जलदुर्ग असून, तो वाघोटन नदीच्या मुखाशी तीन बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेला आहे.
विजयदुर्ग किल्ल्या जवळील प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये देवगड किल्ला, देवगड बीच, कुणकेश्वर मंदिर, कुणकेश्वर बीच, तारकर्ली समुद्र किनारा आणि सिंधुदुर्ग किल्ला यांचा समावेश होतो.
विजयदुर्ग किल्ला हा भारतातील सर्वात प्राचीन आणि अभेद्य जलदुर्गांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे, त्याला अनेकदा 'पूर्वेकडील जिब्राल्टर' असे संबोधले जाते.
छत्रपती शिवाजी महाराज आणि कान्होजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखालील मराठा नौदलाच्या सामर्थ्यात विजयदुर्ग किल्ल्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती.
विजयदुर्ग किल्ला १२ व्या शतकात शिलाहार राजवंशातील राजा भोज (दुसरा) याने हा किल्ला बांधला आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यात सुधारणा, विस्तार केला.
विजयदुर्ग किल्ल्याच्या तटाची उंची सुमारे ३६ मीटर (सुमारे ११८ फूट) इतकी आहे. हा ऐतिहासिक जलदुर्ग सुमारे १७ एकरांवर पसरलेला असून, शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची तटबंदी बळकट केली होती.
वाघोटन खाडीचे विहंगम दृश्य, लाल चिऱ्याच्या दगडांनी बांधलेली भव्य तटबंदी आणि जवळच असलेले रामेश्वर मंदिर ही किल्ल्याची प्रमुख आकर्षणे आहेत.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.