Shreya Maskar
पन्हाळा किल्ला हे एक ऐतिहासिक थंड हवेचे ठिकाण आहे, जे महाराष्ट्रातील कोल्हापूर शहराच्या वायव्येस अंदाजे काही किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.
पन्हाळा किल्ला १२ व्या शतकात (सुमारे ११८ - १२०९ च्या दरम्यान) शिलाहार घराण्याचे राजे भोज (दुसरे) यांनी बांधला. हा किल्ला शिलाहार, यादव, बहामनी, आदिलशाही आणि नंतर मराठा साम्राज्याचा भाग राहिला आहे.
पन्हाळा किल्ला हा त्याच्या नागमोडी वळणांच्या , नागमोडी तटबंदीच्या रचनेमुळे 'सापांचा किल्ला' (Fort of Snakes) म्हणून ओळखला जातो. हा किल्ला दक्षिण दख्खनमधील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक असून ८०० वर्षांहून अधिक जुना आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे.
१६६० मधील 'पन्हाळ्याचा वेढा' आणि त्यातून शिवाजी महाराजांनी केलेला 'विशाळगडाकडे पलायन' हा ऐतिहासिक प्रसंग या किल्ल्याशी निगडित असल्याने, हा किल्ला विशेष प्रसिद्ध आहे.
पन्हाळ्याच्या प्रमुख आकर्षणांमध्ये तीन मजली 'सज्जा कोठी', धान्याची प्रचंड मोठी कोठार असलेली 'अंबरखाना', भव्य 'तीन दरवाजा' आणि निसर्गरम्य 'मसाइ पठार' यांचा समावेश होतो.
पन्हाळा किल्ल्यासोबत येथे जोतिबा मंदिर, पवनखिंड, मसाई पठार, रंकाळा तलाव, शाहूवाडी आणि विशाळगड ही प्रमुख पर्यटन स्थळे आहेत,जिथे इतिहास आणि निसर्गाचा संगम पाहायला मिळतो.
पन्हाळा किल्ला हा मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा, अभेद्य आणि धोरणात्मक लष्करी किल्ला (छावणी) मानला जातो.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.