Fort Near Lohagad : लोहगडजवळ लपलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला, भव्यता पाहून डोळे दिपतील

Shreya Maskar

लोहगड जवळील किल्ला

लोणावळ्याजवळील लोहगडाच्या परिसरात अनेक ऐतिहासिक किल्ले वसलेले आहेत, त्यापैकी विसापूर किल्ला हा लोहगडाचा अगदी जवळचा किल्ला आहे. एका लहान पर्वतरांगेने हे दोन्ही किल्ले एकमेकांशी जोडलेले आहेत.

The Fort Near Lohagad | google

विसापूर किल्ला

विसापूर किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात, लोणावळ्या जवळ मळवली रेल्वे स्थानकाच्या परिसरात स्थित आहे. हा किल्ला ऐतिहासिक लोहगड-विसापूर तटबंदीचा एक भाग आहे.

Visapur Fort | google

अंतर किती?

मुंबई (१०० किमी) आणि पुणे (५०-६० किमी) येथून द्रुतगती महामार्गाद्वारे (Expressway) या किल्ल्यावर सहजपणे पोहोचता येते. त्यामुळे तुम्ही येथे वीकेंडला मित्रांसोबत ट्रिप प्लान करू शकता.

fort | google

ट्रेकिंग

विसापूर किल्ला पावसाळ्यातील ट्रेकिंगसाठीचे एक प्रमुख आकर्षण आहे. तसेच किल्ल्यावरून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Trekking | google

पर्यटन स्थळे

विसापूर किल्ल्याजवळ लोहगड, तिकोना आणि पवना तलावा ही पर्यटन स्थळे पाहायला मिळतात. पेशवेकालीन वाड्याचे ऐतिहासिक अवशेष, हनुमानाची भव्य मूर्ती, प्राचीन पाण्याची टाकी येथे आहे.

Tourist Attractions | google

वैशिष्ट्ये

ब्रिटिशकालीन १० फूट लांबीची प्रचंड लोखंडी तोफ, प्राचीन गुहा, पाण्याची टाकी, 'विंचवाची नांगी' नावाची कडा आणि पेशव्यांच्या वाड्याचे अवशेष यांचा समावेश होतो.

Features | google

लोहगड किल्ला

लोहगड, म्हणजेच 'लोह-किल्ला', हा आपल्या २००० वर्षांच्या इतिहासासाठी, ३३८९ फुटांच्या विस्मयकारक उंचीसाठी आणि भक्कम व सुस्थितीत असलेल्या मराठा स्थापत्यशैलीसाठी प्रसिद्ध आहे.

Lohagad Fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

tips | google

NEXT : धुक्याची चादर, उंच डोंगर अन् निसर्ग शांतता; उन्हाळ्यात फिरा सह्याद्रीच्या कुशीत वसलेले 'हे' थंडगार ठिकाण

Nashik Tourism | saam tv
येथे क्लिक करा...