Shreya Maskar
इगतपुरी हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात, पश्चिम घाटात (सह्याद्री पर्वतरांग) ६०० मीटर उंचीवर वसलेले एक निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण (हिल स्टेशन) आहे.
इगतपुरी आपल्या निसर्गरम्य सौंदर्यासाठी, धबधब्यांसाठी आणि धुक्याने वेढलेल्या पर्वतांसाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही येथे वीकेंडला ट्रिप प्लान करू शकता.
महाराष्ट्रातील इगतपुरी येथे स्थित विपश्यना इंटरनॅशनल ॲकॅडमी (धम्मगिरी) हे जगातील सर्वात मोठ्या आणि प्रमुख विपश्यना ध्यान केंद्रांपैकी एक आहे.
कॅमल व्हॅली विहंगम दृश्यांसाठी ओळखली जाते. एक मनमोहक दरी, जी विशेषतः पावसाळ्यात अत्यंत सुंदर दिसते. तुम्ही इगतपुरीमधील प्रत्येक लोकेशला सुंदर फोटोशूट करू शकता.
भावली धरण आणि लगतचा धबधबा हे पावसाळ्यातील एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. हे भाम नदीवर बांधलेले मातीचे धरण असून, हिरवीगार झाडी, शांत वातावरण आणि उंच कड्यावरून कोसळणाऱ्या धबधब्यासाठी हे प्रसिद्ध आहे.
त्रिंगलवाडी किल्ला निसर्गरम्य भूप्रदेश आणि एका प्राचीन गुहेने वेढलेले एक लोकप्रिय ट्रेकिंग ठिकाण आहे. तुम्ही येथे मित्रांसोबत नक्कीच छान वेळ घालवू शकता.
इगतपुरी येथे सावल्यांची दरी म्हणून ओळखली जाणारी संधान व्हॅली आहे. रोमांचक ट्रेकिंगचा येथे अनुभव येतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.