Summer Konkan Tourism : धुक्याची चादर अन् थंडगार वारा; मे महिन्यात करा कोकण वारी, पाहा 'ही' ५ Hidden हिल स्टेशन्स

Shreya Maskar

कोकण ट्रिप

कोकण नयनरम्य आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांसाठी, समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी आणि निसर्गरम्य किनारपट्टी सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच कोकणातील हापूस आंबा, नारळ जगात प्रसिद्ध आहेत. कोकणात थंड वातावरण अनुभवता येते.

Trip to Konkan | pinterest

आंबोली घाट

सिंधुदुर्ग येथे आंबोली घाट वसलेला आहे. आंबोली घाट समुद्रसपाटीपासून साधारण ६९० ते ७०० मीटर उंचीवर वसलेले एक थंड हवेचे ठिकाण आहे. आंबोली घाट 'महादेवगड किल्ल्या'साठी ओळखले जाते.

Amboli Ghat | pinterest

माचाळ हिल स्टेशन

माचाळ हिल स्टेशन रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेले एक सुंदर आणि कमी प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. याला कोकणचे "मिनी महाबळेश्वर" म्हणूनही ओळखले जाते. सह्याद्री पर्वतरांगांचे सुंदर दृश्ये येथे पाहायला मिळतात.

Machal Hill Station | pinterest

दापोली

दापोली रत्नागिरी जिल्ह्यातील सुंदर हिल स्टेशन आहे. याला 'मिनी महाबळेश्वर' असेही म्हटले जाते, कारण येथील हवामान वर्षभर थंड आणि आल्हाददायक असते. तुम्ही येथे सुंदर फोटोशूट करू शकता.

Dapoli | pinterest

वरंधा घाट

वरंधा घाट हा महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात (सह्याद्री) वसलेला एक निसर्गरम्य घाट आहे. जो त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी, धबधब्यांसाठी आणि घनदाट जंगलांसाठी ओळखला जातो. हा पुणे आणि कोकण प्रदेशाला जोडणारा एक प्रमुख मार्ग आहे.

Varandha Ghat | pinterest

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पश्चिम घाटाच्या पायथ्याशी सावंतवाडी हे शांत आणि निसर्गरम्य शहर आहे. लाकडी शिल्पे, मोती तलाव, शाही राजवाड्यांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. येथून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Sawantwadi | pinterest

कोकणातील प्रसिद्ध समुद्रकिनारे

गणपतीपुळे, तारकर्ली, काशीद, अलिबाग, मुरुड, दिवेआगर, गुहागर, आंजर्ले, निवती आणि वेळास हे कोकणातील प्रसिद्ध समुद्रकिनारे आहे. तुम्ही येथे बोटिंग देखील करू शकता.

Ganpatipule | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Konkan | pinterest

NEXT : मे महिन्यात फॉरेन ट्रिप प्लान करताय? 'येथे' अनुभवाल कडाक्याची थंडी, भर उन्हाळ्यात भरेल हुडहुडी

Summer Foreign Trip | saam tv
येथे क्लिक करा...