Shreya Maskar
उन्हाळ्यात फॉरेन ट्रिपसाठी नेपाळ हे ठिकाण बेस्ट आहे. नेपाळ प्रामुख्याने 'माउंट एव्हरेस्टची भूमी' आणि 'गौतम बुद्धांचे जन्मस्थान' म्हणून ओळखले जाते. नेपाळ हिमालयातील थंड हवेचे ठिकाण आहे.
माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प हे ट्रेकिंगसाठी जगात भारी आहे. नेपाळ हे जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टचे माहेरघर मानले जाते. हे ठिकाण अत्यंत उंचावरील चित्तथरारक ट्रेकिंगचा अनुभव देते.
काठमांडू ही नेपाळची राजधानी आणि देशातील सर्वात मोठे शहर आहे. काठमांडू नगरी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांनी समृद्ध आहे. यामध्ये पवित्र पशुपतिनाथ मंदिर, प्रसिद्ध बौद्धनाथ स्तूप आणि ऐतिहासिक काठमांडू दरबार स्क्वेअर यांचा समावेश होतो.
पोखरा हे नेपाळमधील अन्नपूर्णा प्रदेशाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे शहर आहे. हे शहर 'माछापुच्छ्रे' (फिशटेल) पर्वताची विहंगम दृश्ये, फेवा सरोवरातील नौकाविहार आणि पॅराग्लायडिंगचा अनुभव देते.
लुंबिनी हे भगवान बुद्धांचे जन्मस्थळ असल्याने, हे जगातील सर्वात महत्त्वाच्या आध्यात्मिक स्थळांपैकी एक आहे. नेपाळ जगातील सर्वोच्च शिखरे असलेला एक सुंदर पर्वतीय देश म्हणून प्रसिद्ध आहे.
नेपाळच्या सखल प्रदेशात वसलेले चितवन राष्ट्रीय उद्यान युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. एकशिंगी गेंडे, बंगाल वाघ आणि हत्ती पाहण्यासाठी पर्यटक येथे येतात. जंगल सफारीसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
भक्तपूरमध्ये प्राचीन वास्तुकला पाहायला मिळते. मध्ययुगीन कला, वास्तुकला आणि प्रसिद्ध '५५-खिडक्यांचा राजवाडा' यासाठी हे शहर ओळखले जाते.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.