Shreya Maskar
उन्हाळ्यात मित्रांसोबत कुठे फिरण्याचा प्लान करत असाल तर पालघरची सफर करा. येथे एक ऐतिहासिक पण थरार ट्रेकिंग स्पॉट आहे.
पालघरजवळचा अशेरीगड किल्ला सर्वात आव्हानात्मक आणि धोकादायक किल्ला मानला जातो. येथे पावसाळ्यात चुकूनही जाऊ नये. येथे ट्रेकिंगचा थरार अनुभवता येतो.
अशेरीगड किल्ल्यावर चढण अत्यंत तीव्र आहे. जागोजागी मोठे दगड-धोंडे आहेत. तसेच दोन अत्यंत धोकादायक आणि उघडे (संरक्षण नसलेले) टप्पे आहेत, जे पार करताना विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक असते.
ठाण्यापासून सुमारे ८८ किमी अंतरावर असलेला अशेरीगड हा ८०० वर्षे जुना किल्ला ट्रेकिंगसाठी साधारणपणे ४ तास लागतात. काही लोक तर हा अर्धाच ट्रेक करतात.
अशेरीगड हा पालघर जिल्ह्यामध्ये खोडकणा गावाजवळ वसलेला एक ऐतिहासिक गिरीदुर्ग (डोंगरावरील किल्ला) आहे. वन डे ट्रिपसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.
अशेरीगड किल्ला साधारणतः १६८० ते २००० फूट उंच आहे. ट्रेकिंगच्या थरारक पायवाटेसाठी हा किल्ला ओळखला जातो.
अशेरीगड किल्ल्यावरून 'मनोर' परिसराचे विहंगम दृश्य, पोर्तुगीज राजवटीतील ऐतिहासिक तोफा, पाण्याचा साठा करण्यासाठी बांधलेली विशाल टाकी आणि 'खोडकणा' गावामार्गे किल्ल्यावर जाणारी खडबडीत व निसर्गरम्य पायवाट दिसते.
पालघर रेल्वे स्टेशनवरून मनोर किंवा कासाकडे जाणाऱ्या एस.टी. बस किंवा खाजगी वाहनाने मस्तान नाकाला पोहचा. मस्तान नाका येथून खोडकोना गावासाठी रिक्षा करा. खोडकोना गावातून अशेरीगडच्या मुख्य पायऱ्यांपर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे, येथून वर ट्रेकिंग सुरू होते. di
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.