Shreya Maskar
अमरावती शहराच्या मध्यभागी असलेले श्री अंबादेवी मंदिर आहे, जे देवी दुर्गेला समर्पित एक प्राचीन आणि अत्यंत प्रसिद्ध शक्ती मंदिर आहे.
चिखलदरा हिल स्टेशन हे अमरावतीजवळील सुंदर पिकनिक स्पॉट आहे. चिखलदरा हिल स्टेशन हे जास्त उंचीवर असल्यामुळे येथे थंड हवामान अनुभवता येते. ट्रेकिंगसाठी हे उत्तम लोकेशन आहे.
चिखलदरा हिल स्टेशनला गेल्यावर पंचबोल पॉईंट, हरिकेन पॉईंट व देवी पॉईंट यांसारखी निसर्गरम्य ठिकाणांना नक्की भेट द्या. निसर्गाच्या सानिध्यात तु्म्ही येथे फोटोशूट करू शकता.
चिखलदराजवळ मेळघाट वन्यजीव अभयारण्य आहे. वन्यजीव पाहण्यासाठी आणि जंगल सफारीसाठी येथे तुम्ही गर्दी करू शकता. हे ठिकाण उन्हाळ्याच्या उष्णतेत तुम्हाला शांत करते.
वडाळी तलाव हे ऐतिहासिक, मानवनिर्मित जलाशय आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. येथे बोटिंगचा आनंद घेता येतो. जवळच एक बाग आहे.
चिखलदरा जवळ १४ व्या शतकातील गाविलगड किल्ला आहे. इतिहासप्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण आहे. सातपुडा पर्वतरांगेत वसलेला गाविलगड किल्ला त्याच्या भव्य तटबंदी, तोफा, आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
शक्कर तलाव चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणी वसलेले आहे. येथे सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. वन डे ट्रिपसाठी बेस्ट लोकेशन आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.