Shreya Maskar
चित्तौडगड किल्ला हे भारतातील राजस्थान राज्यात स्थित ७ व्या शतकातील एक विशाल आणि युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे.
चित्तौडगड किल्ला १८० मीटर उंच टेकडीवर वसलेला आहे. चित्तौडगड किल्ला उदयपूर जवळ आहे. तुम्ही येथे शाही अंदाजात फोटोशूट करू शकता.
चित्तौडगड किल्ला भारतातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. चित्तौडगड किल्ल्यामध्ये कालिका माता मंदिर, मीराबाई मंदिर, सातबीस देवरी मंदिर यांचा समावेश आहे.
चित्तौडगड किल्ला हा राजस्थानमधील राजपूत शौर्य, प्रेम, त्याग आणि बलिदानाचे सर्वोच्च प्रतीक आहे. चित्तौडगड किल्ला पाहण्यासाठी परदेशी पर्यटकही गर्दी करतात.
मेवाडची राजधानी राहिलेला हा किल्ला राणी पद्मिनीचा जौहर (आत्मदहन) आणि वीरांच्या केसरिया कथांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे.
चित्तौडगड किल्ला हा नऊ मजली विजय स्तंभासाठी प्रसिद्ध आहे, जो महाराणा कुंभा यांनी १४४०-१४४८ च्या दरम्यान महमूद खिलजीवर मिळवलेल्या विजयाप्रीत्यर्थ बांधला.
चित्तौडगड किल्ल्याच्या दक्षिण भागात एका तलावाच्या मध्यभागी पद्मिनी महल वसलेला आहे, जो एक सुंदर जलमहल मानला जातो.हा तीन मजली पांढरा राजवाडा राणी पद्मिनीचे निवासस्थान होता आणि याच्या चहूबाजूंनी पाणी आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.