suresh dhas news
Suresh DhasSaam tv

Suresh Dhas : मी राजीनामा मागितला नाही, आम्ही छोटे चिल्लर कार्यकर्ते; धनंजय मुंडेंवर सुरेश धस असे का म्हणाले?

Suresh Dhas Latest News : मी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला नाही. आम्ही छोटे चिल्लर कार्यकर्ते आहेत, असे भाष्य सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केले. वाचा सुरेश धस नेमकं काय म्हणाले.
Published on

योगेश काशिद, साम टीव्ही

बीड : मंत्री धनंजय मुंडे यांनी आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. संतोष देशमुख प्रकरण आणि भ्रष्टाचार प्रकरणावर मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला नाही, असे भाजप आमदार सुरेश धस यांनी यावेळी स्पष्ट केले.

संतोष देशमुख प्रकरण आणि भ्रष्टाचार प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय वर्तुळात केली जात होती. अंजली दमानिया देखील गेल्या अनेक दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. या सर्व आरोपांवर मंत्री धनंजय मुंडे यांनी आज भाष्य केलं. मुंडे यांच्या पत्रकार परिषदेनंतर आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली.

suresh dhas news
Suresh Dhas: भाजपच्या सुरेश धसांनी राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंचा काढला भ्रष्टाचार, केले आरोपांवर-आरोप

सुरेश धस म्हणाले, 'मच्छिंद्रनाथ गडावर दुसरा कार्यक्रम आहे. नाथ संप्रदायला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे मुख्यमंत्री तिथे दर्शन घेतील. मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. या वर्षी संतोष देशमुख यांच्यामुळे वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द झाला. आमच्या हक्काचे 4 टीएमसी पाणी मिळावं ही अपेक्षा आहे. हा शासकीय कार्यक्रम आहे, आशेचा किरण आहे. माणूस आशावादी असतो. त्यांच्याकडे गॅरंटी आहे'.

suresh dhas news
Suresh Dhas : अत्याचारपीडित महिलेचा आमदार सुरेश धस यांच्यावर आरोप, पोलिसांवर टाकला दबाव? काय आहे प्रकरण?

'राज्यात देवेंद्र है, तो मुनकीन आहे. हे माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे. पंकजा मुंडे यांचा निरोप आला आहे. शासकीय कार्यक्रम आहे, आम्ही त्यांचा सत्कार करू अभिनंदन करू. आमचं मतभेद वेगळं आहे. या स्टेजवर नाही. हा कार्यक्रम पक्षीय नाही. अजितदादांना फोन केले पण त्यांच्याकडून प्रत्युत्तर आलं नाही, असे धस म्हणाले.

suresh dhas news
Suresh Dhas : पुण्याचा गँगस्टर निलेश घायवळसोबत व्हिडिओ, फोटो व्हायरल; सरपंच हत्येप्रकरणी आक्रमक झालेले सुरेश धस यांनी दिलं स्पष्टीकरण

'मी राजीनामा मागितला नाही. आमदार प्रकाश सोळंके यांनी राजीनामा मागितला. ते त्यांच्या पक्षाचे आहेत. मी मात्र त्यांचा राजीनामा मागत नाही. धनंजय मुंडे जर उद्या आले, तर मी त्यांचं स्वागत करेल. मी 7 तारखेला बोलणार आहे. मी राजीनामा मागत नाही. मी फक्त वर्णन करतो. अजित पवार त्यांच्यामागे ठाम उभे आहेत, असे सुरेश धस यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com