Suresh Dhas: भाजपच्या सुरेश धसांनी राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंचा काढला भ्रष्टाचार, केले आरोपांवर-आरोप

BJP Mla Suresh Dhas Expose Dhananjay Munde Corruption: मविआ सरकारच्या काळात आणि धनंजय मुंडे पालकमंत्री असताना ७३ कोटी ३६ लाख रुपयांचे बोगस बिले उचलली आहेत. असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय.
 BJP Mla Suresh Dhas
BJP Mla Suresh Dhas Expose Dhananjay Munde CorruptionSaam Tv
Published On

बीडमधील सरपंच हत्या प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंवर भाजप आमदार सुरेश धस यांनी परत एकदा गंभीर आरोप केलेत. पत्रकार परिषद घेत त्यांनी एका मागून एक मुंडेंच्या नावाचे घोटाळे त्यांनी बाहेर काढले. धनंजय मुंडे यांनी जिल्हा वार्षिक योजना २०२१-२२ दरम्यान अनेक घोटाळे केलेत. परळी आणि अंबाजोगाई तालुक्यात कामं न करता कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केले. मविआ सरकारच्या काळात आणि धनंजय मुंडे हे पालकमंत्री असताना ७३ कोटी ३६ लाख रुपयांचे बोगस बिले उचलली. अंबाजोगाई येथील ५७ कामाचे १४ कोटी ४५ लाख रुपयांचे बोगस बिले पुन्हा उचलली.

संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. सरपंच अपहरण आणि हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा नीकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड याला त्याचा गँगला अटक करण्यात आलीय. मात्र याचबरोबर कराड आणि धनंजय मुंडे याचे नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत. कारडची कोट्यवधी संपत्तीची माहिती बाहेर आल्यानंतर आता धनंजय मुंडे यांचे भ्रष्टाचार बाहेर येऊ लागलाय.

भाजप आमदार सुरेश धस यांनी मुंडे यांच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचला. त्यांनी एकामागून एक भ्रष्टाचार बाहेर आणले. धनंजय मुंडे यांनी एकाच दिवसात कोट्यवधी रुपयांचे बिल उचलली असल्याचा आरोप धस यांनी केलाय. भाजप अध्यक्ष सुरेश धस यांनी आज पत्रकार परिषदेत परत एकदा धनंजय मुंडेंना टार्गेट करत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. आपल्याला हा घोटाळा दुपारी माहिती झाला त्यानंतर मी हा घोटाळा बाहेर आणतोय, असं धस म्हणाले.

 BJP Mla Suresh Dhas
Manoj Jarange Hunger Strike : सुकलेला चेहरा, अंगात त्राण नाही, उपोषणाच्या ५व्या दिवशी मनोज जरांगेंचा CM फडणवीसांना अल्टिमेटम

जिल्हा वार्षिक योजना २०२१-२२ च्या काळात महाविकास आघाडी सरकारचे सरकार होते त्यावेळी धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात परळी अन् अंबाजोगाई तालुक्यात काम न करता कोट्यवधी रुपयांचे घोटाळे घेतले. यात आरोग्य विभाग २ कोटी २९ लाख, सा.बा विभाग अंबाजोगाई १० कोटी,जिल्हा परिषद बांधकाम विभाग २, १६ कोटी २८ लाख, अशी ६७ कोटी ७० लाख रुपये कामांचे बोगस बिले काढली.

 BJP Mla Suresh Dhas
Santosh Deshmukh Case: मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला तर मी राजीनामा देईल; धनंजय मुंडे

धनंजय मुंडे यांना बिल काढून देण्यात संजय मुंडे नावाचा अभियंता मदत करत असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला. एक रुपयांचे काम न करता एकाच दिवशी हे बिले उचलण्यात आली आहेत. जानेवारी २०२३ ला ९ कामांचे १५ कोटी रुपये उचलले आहेत. परळी - पुस - बर्दापुर या रस्त्यावर पाच कोटी रुपयांचे बोगस बिल काढले. अंबाजोगाई येथील ५७ कामाचे १४ कोटी ४५ लाख रुपयांचे बोगस बिले पुन्हा उचलली असल्याचं धस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com