Suresh Dhas : अत्याचारपीडित महिलेचा आमदार सुरेश धस यांच्यावर आरोप, पोलिसांवर टाकला दबाव? काय आहे प्रकरण?

Beed News : बीडमध्ये एका महिलेने आमदार सुरेश धस यांच्यावर आरोप केला आहे. माझ्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर कारवाई करु नये यासाठी धस दबाव टाकत असल्याचे पीडित महिलेने म्हटले आहे.
Suresh Dhas News
Suresh Dhas NewsSaam Tv (Youtube)
Published On

विनोद जिरे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Suresh Dhas : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणावर आमदार सुरेश धस यांनी जोर दिला. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मागील काही दिवसांपासून सुरेश धस चर्चेत आहेत. दरम्यान दुसऱ्या एका प्रकरणामुळे त्यांच्या नावाची चर्चा होत आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात.

बीडच्या आष्टी तालुक्यात २५ नोव्हेंबर २०२१ मध्ये अत्याचार करण्यात आला होता. या अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार कोकणेच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. पीडितेने या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल करण्यात आल्याची फिर्याद मांडली आहे. यामागे आमदार सुरेश धस असल्याचा दावाही तिने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने अत्याचार प्रकरणात न्यायालयातील तारखेच्या वेळी पोलीस अधिकाऱ्यांनी माझी दिशाभूल असा आरोप केला आहे. या सर्व प्रकारात आरोपीवर कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी आमदार सुरेश धस यांच्याकडून दबाव टाकला जात असल्याचेही तिने म्हटले आहे.

Suresh Dhas News
Court News : 'सेक्स वैवाहिक कर्तव्य नाही'! पतीसह शारीरिक संबंध न ठेवण्यावर न्यायालयाचा निकाल

न्याय मिळावा यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीडितने आमरण उपोषण सुरु केले आहे. काल (२४ जानेवारी) तिने उपोषणाला सुरुवात केली आहे. 'आरोपीपासून माझ्या जीविताला धोका आहे. मला न्याय द्या. आरोपी हे सुरेश धस यांचे निकटवर्तीय आहे. त्यांच्या नावेच मला धमक्या दिल्या जात आहेत', असे पीडित महिलेने म्हटले आहे.

Suresh Dhas News
Republic Day 2025 : महाराष्ट्रातील ४ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक; ३९ जवान ठरले सेवा पदकाचे मानकरी, वाचा संपूर्ण यादी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com