Suresh Dhas : पुण्याचा गँगस्टर निलेश घायवळसोबत व्हिडिओ, फोटो व्हायरल; सरपंच हत्येप्रकरणी आक्रमक झालेले सुरेश धस यांनी दिलं स्पष्टीकरण

Suresh Dhas Statement On Viral Photo: भाजप आमदार सुरेश धस यांचे गँगस्टरसोबत फोटोचे फोटो व्हायरल झाल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. बीड परळीतील गुंडगिरीविरोधात आवाज उठवणारे आमदार सुरेस धस चक्क गँगस्टरसोबत कसे फिरतात? असा सवाल केला जात आहे.
Suresh Dhas
Suresh Dhas Statement On Viral PhotoSaam Tv
Published On

बीड जिल्ह्यातील गुंडगिरीविरोधात रान उठवणारे आमदार सुरेश धस यांचे यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. यावरून आमदार सुरेश धस हे अडचणीत आले आहेत. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धस यांनी आरोपी वाल्मिक कराडच्या अटकेसाठी सरकारवर दबाव आणला होता. तसेच जिल्ह्यातील गुंडाराज वाढल्यानं त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला होता. आता एक गँगस्टर निलेश घायवळसोबतचे सुरेश धस यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.

यावरून त्यांच्यावर टीका केली जात आहे. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर धस यांनी प्रतिक्रिया दिलीय. निलेश घायवळ यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झाले म्हणजे त्याच्याशी आपला काही संबंध आहे, असं नाही. त्याचे इतर लोकांसोबतही फोटो आहेत, असं धस म्हणालेत. कराड गँगचा त्रास बीड जिल्ह्यातील वंजारा समाजातील मुकादमांना देखील झालाय. कारखान्यांकडून खंडणीच्या टक्केवारीने सुपाऱ्या घेऊन वंजारी समाजाच्या मुकादमांना त्रास दिलाय.

Suresh Dhas
Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराडसोबतच्या फोटोमुळे 'विघ्न', पोलिस अधिकारी महेश विघ्नेंची SIT मधून उचलबांगडी

त्यातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले सुद्धा आहेत, त्याच्याविरुद्धात काही पुरावे असून ते लवकरच सादर करू. माझे जे फोटो व्हायरल झालेत, त्याचा आणि माझा कोणताच संबंध नाही. सर्व खोटं आहे. ज्या गँगस्टर निलेश घायवळशी फोटो व्हायरल झालेत त्याचा आणि माझा काही संबंध नाही. माझे दोन्ही मोबाईल तपासा त्यात जर घायवळशी माझा कॉल झाला असेल तर माझा आणि त्याचा काही संबंध आहे, असं म्हणा, असंही सुरेश धस म्हणालेत.

Suresh Dhas
OBC Vanjari Protest: मनोज जरांगे, सुरेश धस यांना अटक करा; पुण्यात पोलसी स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन

घायवळ याचे फोटो राम शिंदे यांच्यासोबतचे सुद्धा आहेत. वर्षा बंगल्यावरील सुद्धा आहेत. इतकेच काय एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुद्धा त्याचे फोटो आहेत. माझ्या मतदारसंघातील एका व्यक्तीच्या लग्नात आला होता. त्याने फोटो काढण्याचा आग्रह केला, त्यामुळे आपण त्याच्यासोबत फोटो काढला. मी क्लिअर कट सांगतो, माझा मोबाईल चेक करा. त्यातून एकही कॉल त्याला गेला असेल तर मी त्याला जबाबदार आहे, असंही सुरेश धस म्हणालेत.

भाजप आमदार सुरेश धस यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीका होत होती. बीड परळीतील गुंडगिरीविरोधात आवाज उठवणारे आमदार सुरेस धस चक्क गँगस्टरसोबत कसे फिरतात? पवनचक्की खंडणीतील मध्यस्थी बिक्कड आणि घायवळ यांच्यातील वादाचं नेमकं कारण काय? पवनचक्की ठेकेदार नितीन बिक्कडला घायवळ गँगने धमकी का दिली होती? असे प्रश्न त्यांना विचारले जात आहेत. त्याच बिक्कडवर धस यांच्याकडून खंडणी डिलिंगचे आरोप झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com