
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्याकांड प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सरकारने १० जणांचे विशेष पथक म्हणजेच एसआयटीची स्थापन केली आहे. या एसआयटीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
या हत्याकांड प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मिक कराडच्या जवळचा पोलिस अधिकारी या एसआयटीमध्ये असल्याचा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. जितेंद्र आव्हाडांनी यासंदर्भात आक्षेप देखील घेतला. त्यांच्या आक्षेपानंतर एपीआय महेश विघ्नेंची उचलबांगडी करण्यात आली आहे.
एपीआय महेश विघ्ने यांना वाल्मीक कराडसोबत फोटो काढणे अंगलट आले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या अक्षेपानंतर महेश विघ्ने यांची उचलबांगडी करण्यात आली. महेश विघ्ने यांच्यासह दोघांना एसआयटीमधून बाजूला सारण्यात आले. महेश विघ्ने यांच्यासोबत हवलादार मनोज वाघ यांनाही बाजूला सारले आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी सोशल मीडियावर वाल्मिक कराड आणि महेश विघ्ने यांचा फोटो पोस्ट करत वाल्मिक कराडचे मित्र असलेले पोलिस अधिकारी निष्पक्ष चौकशी कशी करणार का? असा प्रश्न उपस्थित केला.
आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडचा एक फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला. ज्यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश विघ्ने आणि वाल्मिक कराड एकत्र दिसत असल्याचा आरोप केला जात आहे. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला होता. धनंजय मुंडे विजयी झाल्यानंतर जल्लोष करण्यात आला. त्यावेळीचा या दोघांचा हा फोटो असल्याचा दावा त्यांनी केला. या फोटोवरून वाल्मिक कराड आणि महेश विघ्ने यांची मैत्री असल्याचे बोलले जात आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर देशमुख हत्याकांड प्रकरणात नेमलेल्या एसआयटीमधून महेश विघ्ने यांची उचलबांगडी करण्यात आली.
जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये वाल्मिक कराड आणि महेश विघ्ने यांचा एकत्र असलेला फोटो शेअर केला होता. या पोस्टमध्ये त्यांनी असे लिहिले की, 'संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या एसआयटीमध्ये एक प्रमुख आयपीएस बाहेरील नेमला आहे. त्यांच्याखाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलिस आहेत. यातील एक पीएसआय महेश विघ्ने पहा. धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे. किती जवळचे अन् प्रेमाचे संबध आहेत पहा. हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील? याच विघ्नेने निवडणूक काळात धनंजय मुंडेचा कार्यकर्ता आसल्याप्रमाणे काम केलेले आहे. दुसरा मनोजकुमार वाघ हा वाल्मीक कराडचा अत्यंत खास माणूस असून गेले १० वर्षे तो बीड एलसीबीमध्येच आहे आणि वाल्मीकसाठी काम करतोय.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.